पुणे,
Kicked in the genitals पुण्याच्या सातारा रस्त्यावर घडलेल्या एका भयानक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेत एका तरुणाने रस्त्यावर एका तरुणीवर अगदी फ्रीस्टाईल कुस्तीप्रमाणे लाथा-हातोड्यांनी मारहाण केली. घटनेनुसार, एका किरकोळ वादातून हा तरुण आधी तरुणीच्या कानशिलात मारल्यानंतर तिचा हात खेचण्याचा प्रयत्न करत होता. त्यानंतर ही तरुणी रिक्षात बसून निघणार होती, मात्र त्या तरुणाने रिक्षाजवळ जाऊन तिला काहीतरी बोलले. तरुणी रिक्षा सोडून खाली उतरली आणि त्या तरुणाकडे चालत गेली. यावेळी त्या तरुणाने उडी मारून तिच्या कंबरेखाली गुप्तांगाजवळ लाथ मारली, मात्र थोड्या मागे सरकल्यामुळे तिला गंभीर इजा झाली नाही.

व्हिडिओत असेही दिसते की, मारहाण झाल्यानंतर तो तरुण बाईकवर बसून कोणाला तरी फोन करत होता. तर दुसरीकडे, मारहाण झालेली तरुणीही काही अंतरावर उभा राहून फोन करत असल्याचे दिसते. या घटनेला पाहणाऱ्या लोकांची मोठी गर्दी असूनही, कोणीही पुढे येऊन मारहाण थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. ही घटना के. के. मार्केट ते चव्हाण नगरला जाणाऱ्या मार्गावर घडली. मात्र, Kicked in the genitals मारहाण का झाली आणि हा तरुण व तरुणी यांचा संबंध काय आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. सहकारनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल पवार यांनी सांगितले की, रात्री उशिरापर्यंत या घटनेची कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही. तरीही, पुण्यातील नागरिक या घटनेमुळे संतप्त झाले आहेत आणि या प्रकारावर उपाययोजना होणे आवश्यक असल्याची मागणी करत आहेत.