‘मृदगंध’ वार्षिककास गोंडवाना विद्यापीठाचा प्रथम पुरस्कार

    दिनांक :01-Oct-2025
Total Views |
गडचिरोली, 
University of Gondwana : दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्था गडचिरोली द्वारा संचालित स्थानिक श्री गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालयाच्या ‘मृदुगंध ’या वार्षिकांक गोंडवाना विद्यापीठाच्या प्रथम पुरस्काराचा मानकरी ठरला आहे.
 
 
jlkj
 
 
हा वार्षिकांक ‘सहकार’ यांवर आधारित असून या पुरस्काराचे वितरण येत्या 6 ऑक्टोबरला विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त होणार्‍या समारंभात प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे व संपूर्ण संपादक मंडळाला दिला जाणार आहे. सदर अंकाचे प्रकाशन नुकतेच सहकार महर्षी अरविंद सावकार पोरेड्डीवार यांच्या हस्ते करण्यात आले होते. यापूर्वीही महाविद्यालयाच्या मृदुगंध वार्षिककास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा प्रथम पुरस्कार मिळाला आहे. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या स्थापनेपासून अनेक पुरस्काराने सन्मानित केले आहे. सलग पाचवेळा प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते, हे विशेष. दरवर्षी प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांच्या मार्गदर्शनात मृदुगंध विशेषांक वेगवेगळ्या शीर्षकाखाली प्रकाशित होत असून यापूर्वी कोरोना, पर्यटन, राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारतरत्न लता मंगेशकर, वन्यजीव व मानव संघर्ष, कृत्रिम बुद्धिमत्ता अशा विविध विषयांवर हे वार्षिकांक प्रकाशित झालेले आहेत .
 
 
महाविद्यालयाच्या ‘मृदगंध’ या वार्षिककास अतिशय प्रतिष्ठेचा मानला जाणारा राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई द्वारा आयोजित यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय महाविद्यालयीन नियतकालिका स्पर्धा 2021 चा सर्वोत्कृष्ट वार्षिककांचाचा प्रथम पुरस्कार सुद्धा प्राप्त झालेला आहे. ‘सहकार’ यांवर आधारित मृदुगंध वार्षिकांक अतिशय दर्जेदार असून यामध्ये सहकार महर्षी अरविंद सावकार पोरेड्डीवार, डॉ. सतीश गोगुलवार, केशवगुरुनुले, तसेच सुप्रसिद्ध उद्योजक रतन टाटा, पक्षितज्ञ मारोती चितमपल्ली, अशोक सराफ, जाकीर हुसेन इत्यादींवर विद्यार्थ्यांनी आप-आपले लेख, कविता लेखन केले आहे. हा अंक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांच्या मार्गदर्शनात मुख्य संपादक प्रा. डॉ. रवींद्र विखार, सहाय्यक संपादक डॉ. भास्कर तृपटे, डॉ. दशरथ आदे, प्रो. नरेंद्र आरेकर, प्रा. डॉ. गुणवंत वडपल्लीवार, आशिष बगमारे, सतीश मुनघाटे, श्रेयस टेंभुर्णे, कल्याणी उईके यांनी संपादक मंडळात कार्य के ले आहे.
 
 
सदर पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल संस्थेचे पदाधिकारी, स्थानिक व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, पालक सभेचे सर्व पदाधिकारी, माजी विद्यार्थी संघटनेचे सर्व पदाधिकारी, सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे.