पोहणा रुद्रेश्वर देवस्थानाला ‘ब वर्ग’ तीर्थक्षेत्र दर्जा

आ. कुणावार यांच्या पाठपुराव्याला यश

    दिनांक :01-Oct-2025
Total Views |
हिंगणघाट,
sameer-kunawar : तालुक्यातील पोहणा येथील प्राचीन तसेच ऐतिहासिक हेमांडपंती रुद्रेश्वर देवस्थानला आ. समीर कुणावार यांच्या पुढाकारामुळे यापूर्वीच ब वर्ग तीर्थक्षेत्र म्हणून या देवस्थानाला मान्यता मिळाली आहे.
 
 
 
sameer
 
 
 
मंदिरात सतत असणारी भतांची वर्दळ व धार्मिक महत्त्व लक्षात घेता या देवस्थानाला पुढे ‘ब वर्ग’ दर्जा मिळावा यासाठी आ. समीर कुणावार यांनी सातत्याने शासनदरबारी पाठपुरावा केला. अखेर आता त्यांच्या प्रयत्नाला यश लाभले असून शासनाने या प्राचीन रुद्रेश्वर मंदिराला तीर्थक्षेत्राचा ‘ब वर्ग दर्जा’ बहाल केला आहे. अशी माहिती पालकमंत्री पंकज भोयर यांनी दिली.
 
 
हेमाडपंती शैलीतील रुद्रेश्वर मंदिर हे इतिहास, श्रद्धा तसेच स्थापत्यकलेचे अद्वितीय प्रतीक आहे. मंदिराचे वैभवशाली बांधकाम  ५० फूट उंच, ८० फूट लांब, ३६ फूट रुंद रचना, एकाच दगडातून कोरलेली धान्य सामावणारी दुर्मिळ पिंड, तसेच राष्ट्रकुटकालीन चतुर्मुख ब्रह्मदेवाची मूर्ती  या सर्व गोष्टी या देवस्थानाला विशेषत्व प्रदान करतात. इतिहासतज्ञांच्या मते हे मंदिर सुमारे १००० ते १२०० वर्षांपूर्वीचे असल्याचे सांगण्यात येते. या निर्णयामुळे केवळ देवस्थानाचा गौरवच वाढला नाही, तर पोहणा गावाला धार्मिक पर्यटनाच्या नकाशावर महत्त्वाची ओळख लाभली असल्याची भावना आ. समीर कुणावार यांनी व्यत केली.