पीओके,
PoK Protest 2025 : पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील स्थानिकांनी बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी पाकिस्तानी सैन्याविरुद्ध तीव्र निदर्शने केली. पाकिस्तानी सुरक्षा दल आणि निदर्शकांमध्ये अनेक ठिकाणी भीषण चकमकी झाल्या. मुझफ्फराबाद आणि पोंझाकच्या इतर भागात शांततापूर्ण निदर्शकांवर पाकिस्तानी रेंजर्सनी गोळीबार केला, ज्यामध्ये ८ जणांचा मृत्यू झाला आणि १०० हून अधिक जण जखमी झाले.
शांततापूर्ण निदर्शक स्वराज्याच्या मागणीसाठी आंदोलन करत होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन दिवसांत अर्धा डझनहून अधिक लोक मारले गेले आहेत आणि अनेक गंभीर जखमी झाले आहेत. निदर्शने अजूनही सुरूच आहेत. पाकिस्तानी सैन्य आणि सरकार निदर्शकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत.