सिंधू महाविद्यालयात पोलीस जागरूकता कार्यक्रम

    दिनांक :01-Oct-2025
Total Views |
नागपूर,
sindhu-college राष्ट्रीय सेवा योजना, दादा रामचंद बाखरू सिंधू महाविद्यालय, पाचपावली पोलीस स्टेशन व प्रकृती संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात पोलीस विभागाचे विविध जागरूकता कार्यक्रम आयोजित करण्यात आले.प्रकृती फौंडेशनच्या शलाका बिनीवाले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सिनिअर पोलीस इन्स्पेक्टर, पाचपावली पोलीस स्टेशन, प्रमुख वक्ते, बापूराव राऊत यांनी ऑपरेशन थंडर, ऑपरेशन शक्ती आणि ऑपरेशन यू टूर्न याबाबत माहिती दिली. तसेच अमली पदार्थ, मानवी तस्करी व नागरी कर्तव्याबाबत पोलीस दीदींनी मार्गदर्शन केले.

shin 
 
रा से यो संयोजक डॉ. पूजा मोहोबे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला,sindhu-college तर भाग्यश्री इसरानी यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवक व शिक्षकांनी सक्रिय सहभाग घेतला.
सौजन्य:मिलिंद शिनखेडे,संपर्क मित्र