धनुष-कृती सेननची जोडी ‘तेरे इश्क में’ मधून पहिल्यांदाच एकत्र

आनंद एल राय दिग्दर्शित प्रेमकथेचा थरारक टीझर प्रदर्शित

    दिनांक :01-Oct-2025
Total Views |
मुंबई,
Tere Ishk Mein ‘रांझणा’ आणि ‘अतरंगी रे’ यांसारख्या हिट चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनात घर करणारा दिग्दर्शक आनंद एल राय आणि अभिनेता धनुष ही हिट जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर ‘तेरे इश्क में’ या नव्या प्रेमकथेच्या माध्यमातून परतत आहे. आज, १ ऑक्टोबर रोजी, या चित्रपटाचा टीझर टी-सिरीजच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित झाला असून त्याने प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण केली आहे.
 
 

Tere Ishk Mein 
या चित्रपटात Tere Ishk Mein धनुषच्या समोर अभिनेत्री कृती सेनन पहिल्यांदाच झळकणार आहे. टीझरमध्ये दिसणारी त्यांच्या दोघांची केमिस्ट्री आणि भावनिक उभारणी लक्ष वेधून घेणारी आहे. टीझरची सुरुवात कृतीच्या हल्दी समारंभाने होते, जिथे धनुषचा पात्र तीव्र संतापाने तिच्यावर गंगाजल शिंपडतो आणि एक अशुभ शाप देतो — की देव शंकर तिला मुलगाच देओ, जेणेकरून त्या मुलालाही त्याचं तुटलेलं प्रेम अनुभवावं लागो. या एका दृश्यातूनच या चित्रपटात प्रेम, वेदना आणि बदलेची भावना किती खोलवर रुजली आहे, हे स्पष्ट होतं.चित्रपटाच्या टीझरमध्ये केवळ काही क्षण दाखवले गेले असले तरी त्यातून प्रेक्षकांना एका उत्कट प्रेमकथेचा आभास मिळतो — जिथे प्रेम केवळ भावना नसून एक प्रकारचा जीवघेणा वेडावाकडा प्रवास आहे. आनंद एल राय यांच्या दिग्दर्शनशैलीला अनुरूप असलेला हा टीझर प्रेक्षकांमध्ये कथा जाणून घेण्याची उत्सुकता अधिकच वाढवतो.
 
 
धनुषने पुन्हा एकदा Tere Ishk Mein एका जिवंत आणि वेदनादायक व्यक्तिरेखेत काम केल्याचं दिसून येत आहे. ‘रांझणा’ आणि ‘अतरंगी रे’ नंतर ही त्याची आनंद एल रायसोबतची तिसरी फिल्म आहे. दुसरीकडे, कृती सेननसाठी हा आनंद एल रायसोबतचा पहिलाच चित्रपट असून, ती एका नव्या, गंभीर रूपात दिसत आहे. टीझर पाहता हे दोघं कलाकार नव्या रुपात प्रेक्षकांना नक्कीच आश्चर्यचकित करतील, अशी आशा निर्माण होते.
चित्रपटाच्या संगीताचीही जोरदार चर्चा सुरु झाली आहे. ए. आर. रहमान यांच्या संगीत दिग्दर्शनाखालील आणि इरशाद कामिल यांचे गीतलेखन असलेलं ‘तेरे इश्क में’ चे संगीत हे या चित्रपटाचं आणखी एक वैशिष्ट्य ठरणार आहे. टीझरमध्ये ऐकू आलेली पार्श्वधून अगदी हृदयस्पर्शी असून, प्रेक्षकांच्या मनात संपूर्ण अल्बमबद्दल उत्सुकता निर्माण करते. सूत्रांच्या माहितीनुसार, या चित्रपटात सहा ते सात गाणी असणार असून, रहमान यांनी या संगीतात विशेष मेहनत घेतली आहे.
 
 
‘तेरे इश्क में’ हा चित्रपट Tere Ishk Mein  ‘रांझणा’चा सिक्वेल आहे का, असा प्रश्न अनेकांच्या मनात घर करत आहे. टीझरमधील काही भावनिक छटा आणि कथानकातील पार्श्वभूमी पाहता, काही प्रमाणात ‘रांझणा’ची आठवण होते. मात्र, निर्मात्यांनी स्पष्ट केले आहे की ही एक पूर्णपणे वेगळी कथा आणि नवीन पात्रांवर आधारित फिल्म आहे.‘तेरे इश्क में’ या चित्रपटाबाबत अजून फारसा तपशील उघड करण्यात आलेला नसला तरी, टीझरमुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. आता फक्त चित्रपटाच्या अधिकृत ट्रेलरची आणि प्रदर्शना तारखेची प्रतीक्षा आहे. धनुष आणि कृती सेनन यांची ही नवीन जोडी, रहमानचं संगीत आणि आनंद एल रायचं दिग्दर्शन — हे त्रिकूट बॉक्स ऑफिसवर नक्कीच जादू करेल, अशी शक्यता आहे.