देवरी तालुक्यातील भाविकांच्या दुचाकीचा अपघात दोघांचा मृत्यू : एक गंभीर

- डोंगरगड येथे दर्शनाला जात असताना काळाची झडप

    दिनांक :01-Oct-2025
Total Views |
गोंदिया, 
deori news छत्तीसगड राज्यातील डोंगरगड येथे बमलेश्वरी देवीच्या दर्शनाला जात असलेल्या देवरी तालुक्यातील शिलापूर (भोयरटोला) येथील भाविकांच्या दुचाकीचा अपघात होऊन दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवार १ ऑक्टोबर रोजी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास छत्तीसगड राज्यातील छुरीया गावाजवळ घडली.
 
 
accident
 
 
संजय मानकर, आशिष फुने अशी मृतकाची नावे असून श्यामकुमार भोयर असे गंभीर जखमीचे नाव आहे. तिघेही देवरी तालुक्यातील शिलापूर (भोयरटोला) येथून दुचाकी क्रमांक एमएच ३५ X५१७५ ने डोंगरगड बमलेश्वरी देवीच्या दर्शनासाठी जात होते. दरम्यान, महाराष्ट्र व छत्तीसगड राज्याच्या सीमाशुल्क तपासणी नाका परिसरातील छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव जिल्ह्यातील छूरीया गावाजवळ त्यांच्या भरधाव दुचाकीची समोरील ट्रकला धडक बसली.deori news धडक एवढी जोरदार होती की, यात संजय व आशिष या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर श्यामकुमार हा गंभीर जखमी झाला. काही प्रत्यक्षदर्शींनी जखमी श्यामकुमारला उपचारासाठी रुग्णवाहिकेतून राजनांदगाव येथील रुग्णालयात दाखल केल्याची माहिती असून घटनेची माहिती मिळताच देवरी तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.