ओला दुष्काळ व कर्जमाफीसाठी पायदळ वारी

*देवळी ते आगरगावपर्यंत ज्योत यात्रा

    दिनांक :01-Oct-2025
Total Views |
देवळी,
infantry raids : सततच्या पावसामुळे सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोयाबीनच्या दाण्याला कोंब फुटत आहे. कपाशीवर देखील मर रोगाने आक्रमण केले आहे. उत्पन्नात मोठी घट होणार असून वर्धा जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकर्‍यांना हेटरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई तसेच शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमुती करण्याची सरकारला भवानी मातेने सद्बुद्धी द्यावी, या कठीण काळात शेतकर्‍यांना सावरण्याचे बळ द्यावे ही आर्त हाक भवानी मातेला देण्याकरिता ३० सप्टेंबर रोजी अष्टमीला लहान मातामाय मंदिर येथून किरण ठाकरे यांच्या नेतृत्त्वात पायी ज्योत यात्रा काढण्यात आली.
 
 
k
 
 
नांदोरा, पळसगाव येथील शेतकर्‍यांनी या पायदळ ज्योत यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. यावेळी किरण ठाकरे यांनी उपस्थित शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले. रात्री ९ वाजता ही ज्योत यात्रा भवानीमाता मंदिर आगरगाव येथे पोहोचली. सहभागी शेतकर्‍यांनी भवानी मातेची पूजा करून ओला दुष्काळ जाहीर करावा व संपूर्ण कर्जमुती करावी, अशी सरकारला सद्बुद्धी देण्याची आर्त हाक भवानीमातेला घातली. त्यानंतर आगरगाव येथे यात्रेचा समारोप करण्यात आला. समारोपीय सभेला प्रवीण कात्रे, अ‍ॅड. मंगेश घुंगरूड यांनी शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले.