नागपूर,
Women empowerment महिला सशक्तीकरणाचा संदेश देण्यासाठी रामटेकच्या दोन धाडसी महिला, लक्ष्मी माथरे आणि डॉ. अंशुजा किम्मतकऱ तब्बल २४ हजार किमी अंतराची, २६ राज्यांची भव्य परिक्रमा करणार आहेत. गांधी चौक, रामटेक येथून राज्य मंत्री आ. आशिष जयस्वाल यांच्या हस्ते पहिला फ्लॅग-ऑफ झाला. दुसरा फ्लॅग-ऑफ नागपूरच्या झिरो माईल येथे आमदार कृपाल तुमाने यांच्या उपस्थितीत पार पडला.
या प्रवासा दरम्यान महिलांच्या सबलीकरणाचा संदेश देशभर पोहोचविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, या मोहिमेतील सहभागी डॉ. अंशुजा किम्मतकऱWomen empowerment यांनी यापूर्वी २४ तासांत सर्वाधिक हाताने बनविलेली ग्रीटिंग कार्डस् तयार करून लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये आपला विक्रम नोंदवला आहे.६० दिवसांचा हा प्रवास देशभरातील महिलांसाठी तसेच समाजासाठी प्रेरणादायी ठरणार आहे.रामटेक आणि नागपूरवासीयांनी या ऐतिहासिक मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत दोन्ही महिलांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
सौजन्य:सारंग पांडे,संपर्क मित्र