मानोरा,
electricity poles तालुक्यातील गव्हा उपविज केंद्रातून वीज पुरवठा होत असलेल्या कारखेडा या गावातील भरवस्तीतील वीज वाहक खांब जमिनीलगत मोठ्या प्रमाणात फुटल्याने हा तुटका खांब कधी कोसळेल हे सांगता येत नसल्यामुळे मोठा अपघात होऊन कोणाची जीवित व शारीरिक हानी झाल्यास त्याची जबाबदारी वीज वितरण कंपनी प्रशासन घेणार काय असा सवाल या धोकादाय वीजवाहक खांबामुळे उपस्थित होत आहे.
स्थानिक गजानन देशमुख यांच्या पेठ गिरणी जवळ असलेला हा वीज वाहक खांब वार्ड क्रमांक दोन मध्ये महाराष्ट्र राज्य वीज मंडळाने अनेक वर्षांपूर्वी रोवलेला आहे. या खांबाची अवस्था अतिशय दयनीय झालेली असून, खाली जमिनीलगत आणि मध्यभागी या खांबाची मोठी झीज झाली आहे. कुठल्याही क्षणी हा भरवस्तीतील खांब कोसळू शकतो, अशा अवस्थेत सध्या हा वीज वाहक खांब पोहोचलेला आहे.electricity poles वस्तीत मध्यभागी आणि रहदारीच्या ठिकाणी असलेला हा खांब जर कोसळला तर या अवजड खांबाच्या वजन आणि जिवंत वीज प्रवाहाने कुठलीही जीवित व शारीरिक, आर्थिक हानी झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल या झिजलेल्या वीज वितरण कंपनी प्रशासनाच्या मालकीच्या खांबामुळे निर्माण झालेली आहे.