जलतरणपटू भार्गवचा ऐतिहासिक विजय

    दिनांक :10-Oct-2025
Total Views |
नागपूर,
Swimming Competition रामटेकचा युवा जलतरणपटू भार्गव मुकादमने नागपूर जिल्हा जलतरण स्पर्धा २०२५ मध्ये अंडर १४ बॉईज गटात तीनही प्रकारात प्रथम क्रमांक मिळवून शहराचा अभिमान वाढवला आहे.
 
ramtek
 
यशाच्या प्रकारांमध्ये
२०० मीटर बॅकस्ट्रोक
१०० मीटर फ्रीस्टाईल
२०० मीटर इंडिव्हिज्युअल मेडले
प्रशिक्षणासाठी रोज शाळा आटोपल्यानंतर नागपूरमध्ये जाणाऱ्या आणि रात्री परतणार्‍या कर्तव्यदक्ष पिता अविनाश मुकादम, आई सुचिता मुकादम, आदर्श शाळेचे अध्यक्ष मयंक देशमुख आणि सृष्टी सौंदर्य परिवार यांचे पाठबळ या यशामागील प्रमुख कारण ठरले आहे. Swimming Competition स्थानिक, जिल्हा, विभागीय व राज्यस्तरावर झेप घेण्याच्या मार्गावर भार्गवची वाटचाल प्रेरणादायी असून, हे यश रामटेकमधील नव्या पिढीला प्रेरणा देणारे आहे.
सौजन्य: सारंग पांडे, संपर्क मित्र