एसआर इंग्रजी शाळेच्या विद्यार्थ्यांचे क्रीडा स्पर्धेत सुयश

    दिनांक :10-Oct-2025
Total Views |
मंगरुळनाथ,
sr english school वाशीम येथे शालेय स्तरावर चालू असलेल्या विविध मैदानी खेळांमध्ये शेलुबाजार येथील श्रीमती सरस्वतीबाई राऊत इंग्रजी शाळेचे विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. बॅडमिंटन या खेळामध्ये जिल्हा स्तरावर उपविजेता ठरलेल्या १७ वर्षे वयोगटातील स्वर्णिमा राऊत, राधा सुर्वे, अनुष्का गावंडे, श्रुती गावंडे, श्रावणी राऊत या मुलींनी यश संपादन केले आहे तसेच रनिंग या खेळामध्ये १४ वर्षे वयोगटामध्ये सार्थक पाचे व १७ वर्षे वयोगटामधून शंतनू सोनोने यांची जिल्हास्तरावर निवड झाली आहे.
 
 

sr  
 
 
गोळाफेक १७ वर्षे वयोगटात मधून प्रथम क्रमांक सार्थक भुजाडे व द्वितीय क्रमांक सर्वेश इंगळे तसेच उंच उडी मध्ये १७ वर्ष वयोगटामधून राम गंगावणे यांनी यश मिळवले आहे. तसेच १०० मीटर धावण्यामध्ये १४ वर्षे वयोगटातील हर्षदा डोके, १७ वर्ष वयोगटातील २०० मीटर धावण्या मध्ये दिव्या सोनटक्के, १७ वर्षे वयोगटातील ४०० मीटर धावण्यामध्ये साक्षी बाईसकार, ८०० मीटर धावण्यामध्ये १७ वर्षे वयोगटातील ईश्वरी पुरी व जान्हवी गुजर तसेच १५०० मीटर धावण्यामध्ये १७ वर्षे वयोगटातील मयुरी चव्हाण, ३००० मीटर धावण्यामध्ये१७ वर्षे वयोगटातील वेदिका राठोड या मुलींनी घवघवीत यश संपादन केले आहे. तसेच गोळा फेक या खेळामध्ये १७ वर्षे वयोगटातील ज्ञानेश्वरी येवले हिने सुद्धा यश संपादन केले आहे.sr english school उपरोक्त सर्व यशस्वी विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर निवड झालेली असून शाळेचे संचालक उद्धव राऊत व शाळेच्या मुख्याध्यापिका शितल राऊत यांनी विद्यार्थ्यांचे व क्रीडा शिक्षक गजानन अरसोड यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.