समुद्रपूर,
Container-Two-Wheeler Accident : तालुक्यातील नागपूर हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील कांढळी चौकात दुचाकीस्वाराला कंटेनरने मागून जबर धडक दिली. यात दुचाकीस्वार रस्त्यावर पडुन त्याच्या डोक्यावरून कंटेनरचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज १० रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.

मिळालेल्यामाहितीनुसार नागपूर बेसा येथील अभय किनकर हा चंद्रपूर येथील पावर हॉऊस येथे कनिष्ठ अभियंता आहे. तो आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास नागपूरवरून चंद्रपूर येथे आपल्या एम. एच. ४० बि. एच ४९७५ क्रमांकाच्या दुचाकीने कामावर जात असताना कांढळी चौकात मागून येणार्या एच. आर. ३८ ए.जे. ६०७५ क्रमांकाच्या कंटेनरने दुचाकीला मागून जबर धडक दिली. यात दुचाकीस्वार अभय किनकर खाली पडून त्याच्या डोयावरून ट्रकचे चाक गेल्याने तो जागीच ठार झाला. घटनास्थळाजवळ ट्रक पलटी झाल्याने त्याला उचलण्याचे काम सुरू असल्यामुळे एकतर्फा वाहतूक सुरू होती. यामुळे ही एकतर्फा वाहतूक अपघाताला कारणीभूत ठरली असे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच सिंदी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक ज्ञानोबा पयनाटे, पोलिस कर्मचारी उमेश खामनकर, संजय भगत यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालय हलविला. या अपघाताची नोंद सिंदी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.