अनिल कांबळे
नागपूर,
Nagpur murder verdict गावातील युवकासाेबत विवाहित महिलेचे अनैतिक संबंध जुळले. त्याची कुणकुण पतीला लागली. त्यामुळे विवाहितेने प्रियकराच्या मदतीने पतीची हात-पाय पलंगाला बांधून उशीने नाक-ताेंड दाबून हत्या केली हाेती. या हत्याकांडात न्यायालयाने महिला व तिच्या प्रियकरासह तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. रूपेश दिलीप बिरहा (वय 35, रा. नगरपरिषद हाॅस्पिटलजवळ, कामठी), शुभांगी (वय 30, रा. भीमनगर, पाण्याचे टाकीजवळ, कामठी) आणि हरिचंद्र राजेंद्र बिरहा (वय 36, रा. बाेरीयापुरा, कामठी) अशी दाेषींची नावे आहेत. या प्रकरणात अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश मनीष गणाेरकर यांनी निर्णय दिला.
शुभांगी व राजू हे दाम्पत्य कामठीत राहत हाेते. राजू हा कामानिमित्त नेहमी बाहेरगावी राहत हाेता. यादरम्यान, शुभांगीचे रुपेश बिरहा याच्याशी अनैतिक संबंध निर्माण झाले. दाेघांच्या प्रेमसंबंधाची चर्चा संपूर्ण गावात हाेती. त्याची माहिती शुभांगीचे पती राजू यांना समजली हाेती. यामुळे पती-पत्नीमध्ये नेहमी वाद हाेत हाेता. ताे शुभांगीला नेहमी मारहाण करीत हाेता. त्यामुळे रुपेशचा व्यथित झाला हाेता. शुभांगीला हाेणाèया त्रासामुळे त्यांनी पती राजूचा काटा काढण्याचा कट रचला. 7 ऑगस्ट 2020 राेजी राजू घरात झाेपला हाेता. कटानुसार शुभांगीने प्रियकर रुपेशला मध्यरात्री एक वाजता घरी बाेलावले. रुपेश आणि त्याचा साथिदार हरिचंद्र बिरहा हासुद्धा साेबत हाेता.
झाेपेत असलेल्या Nagpur murder verdict पतीचे शुभांगीने दाेरीने पलंगाला हात-पाय बांधले. त्यानंतर रुपेश आणि हरिचंद्र या दाेघांनी उशीने नाक-ताेंड दाबून राजूचा खून केला. दुसèया दिवशी कामठी पाेलिसांनी या गुन्ह्याची नाेंद केली. शुभांंगी आणि तिच्या प्रियकराने खून केल्याची माहिती समाेर आली. त्यांना कामठी पाेलिसांनी अटक केली. न्यायालयाने सर्व साक्षी आणि पुरावे लक्षात घेत तिघांना सश्रम कारावास, पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. शासनार्ते अॅड. कल्पना पांडे यांनी बाजू मांडली तर आराेपींर्ते अॅड. दीपक दीक्षित, चेतन ठाकूर आणि अशाेक भांगडे यांनी बाजू मांडली. या प्रकरणात अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश मनीष गणाेरकर यांनी हा निर्णय दिला.