नागपूर,
World Animal Day’‘जागतिक पशू दिना’च्या दिवशी नागपूरातील रिअल केअर स्मॉल अॅनिमल क्लिनिकमध्ये खऱ्या अर्थाने करुणेचा अनोखा धडा घडला. माणसासारख्या भावना असलेल्या एका मुक्या जीवाला यातनांतून मुक्तता देण्यात डॉक्टरांना यश आले.या क्लिनिकमध्ये एका स्त्री श्वानाला स्तनावर प्रचंड गाठ झाल्याने ती चालणे, बसणेही अशक्य झाले होते. गाठ इतकी वाढली होती की ती लोंबकळत होती आणि सतत वेदना होत होत्या. परिस्थिती गंभीर होताच पशुवैद्यक शल्यचिकित्सक डॉ. समृद्धी झरकर-देशमुख आणि डॉ. मकरंद दीक्षित यांनी तातडीने शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला.
तासभर चाललेल्या या कठीण शस्त्रक्रिये दरम्यान डॉक्टरांनी तब्बल १.८ किलो वजनाची गाठ यशस्वीरित्या काढून टाकली. शस्त्रक्रियेनंतर त्या श्वानाने पहिल्यांदाच निर्धास्त श्वास घेतला.World Animal Day’ आणि क्लिनिकमधील सर्वांचे डोळे पाणावले.या शस्त्रक्रियेमुळे त्या प्राण्याला नवजीवन मिळाले असून, त्याच्या मालकांसह स्थानिक प्राणीप्रेमींनी डॉक्टरांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.जागतिक पशू दिना’च्या दिवशीच ही कृती साकारल्याने या घटनेला एक विशेष भावनिक स्पर्श लाभला आहे.
सौजन्य: डॉ. समृद्धी झरकर-देशमुख,संपर्क मित्र