वाहनाच्या धडकेत एक जण ठार

आमगव्हाण नजिकची घटना

    दिनांक :11-Oct-2025
Total Views |
मानोरा,
Amgavan fatal accident मानोरा - मंगरूळनाथ रोडवरील आमगव्हाण - अभयखेडा दरम्यान डोंगरगाव फाट्याजवळ सिमेंट रोडवर आमगव्हाण येथिल संजय वामन इंगोले ( वय ४५ ) हे मॉर्निंग वॉक करीत असताना एका भरधाव वाहनाने जबर धडक दिल्याने जागीच ठार झाल्याची घटना १० ऑटोबर रोजी पहाटे ५.४० वाजताच्या सुमारास घटना घडली.
 

Amgavan fatal accident 
सविस्तर असे की, आमगव्हाण येथील संजय इंगोले हे १० ऑटोबर रोजी सकाळी मानोरा, मंगरूळनाथ रोडवर मॉर्निंग वॉक करण्यासाठी गेले होते. घरी परत येत असताना मंगरुळनाथ येथून मानोराकडे येणार्‍या एका भरधाव वाहनाने (ऑटो क्रमांक एम.एच.२० सी. ए.१२४५) जबर दिली. या धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले असता डॉटरांनी मृत घोषित केले. फिर्यादी रामेश्वर सुधाकर ढवळे यांच्या तक्रारी वरून पोलिसांनी आटो चालक आरोपी महादेव नामदेव टाले राहणार गिरोली यांच्या विरुद्ध कलम १०६(१),२८१,१८४,१३४ बी. एन.एस.नुसार गुन्हा दाखल केला. अधिक तपास मानोरा पोलिस करीत आहेत.