वर्धा,
Anupama Deshpande जय महाकाली शिक्षण संस्था व सृजन म्युझिकलच्या संयुत वतीने हर पल किशोर हा किशोर कुमार यांच्या गाण्यांवर आधारित कार्यक्रम स्थानिक अग्निहोत्री कॉलेज कॅम्पसच्या शिवशंकर सभागृहात उद्या रविवार १२ रोजी वर्धेतील गायक शशिकांत बागडदे यांच्यातर्फे प्रस्तुत होत आहे. या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध पार्श्वगायिका अनुपमा देशपांडे (मुंबई) गायन सादर करणार आहे.
अनुपमा देशपांडे यांनी ८० च्या दशकामध्ये किशोर कुमार यांची सह-गायिका म्हणून जवळपास आठ ते नऊ वर्ष गायन केले आहे. अनुपमा देशपांडे यांच्यासोबत मुलगी दीपा या सुद्धा गायिका म्हणून कार्यक्रमात सहभाग नोंदवणार आहे. सहगायिका म्हणून श्रावणी आपली गीते सादर करणार आहे.
वर्धेत किशोर कुमारच्या जयंतीला हर पल किशोर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. कार्यक्रमांतर्गत किशोर कुमार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या वयाच्या नंबरप्रमाणे तेवढ्या किलोचा केक कापून रसिकांना सभागृहातच वाटण्यात येतो. वर्धेतील रसिकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन जय महाकाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री व सृजन म्युझिकलचे कार्यक्रम संयोजक शशिकांत बागडदे यांनी केले आहे.