जिल्ह्यात मनरेगा योजनेतून बांबू लागवडीला चालना द्यावी : ना. पाशा पटेल

बांबू लागवड आढावा बैठक संपन्न

    दिनांक :11-Oct-2025
Total Views |
वाशीम,
MGNREGA, अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी व पर्यावरणपूरक शेतीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने मनरेगा योजनेच्या माध्यमातून राज्यात बांबू लागवड मोठ्या प्रमाणावर राबविण्याचा उपक्रम सुरू आहे. बांबू लागवड ही केवळ शेती नसून टिकाऊ उपजीविकेचा मार्ग आहे. असे प्रतिपादन कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) पाशा पटेल यांनी केले.
 

bamboo cultivation MGNREGA, Pasha Patel bamboo initiative, 
मनरेगा योजनेच्या सहाय्याने सुरू असलेल्या बांबू लागवड या उपक्रमाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील राजे वाकाटक सभागृहात आज, ११ ऑटोबर रोजी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहाण, उपवनसंरक्षक अभिजित वायकोस, अपर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र जाधव, उपजिल्हाधिकारी (रोहयो) कैलास देवरे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्ह्यातील मनरेगा अंतर्गत सुरू असलेल्या बांबू लागवडीच्या कामांचा आढावा घेण्यात आला. बांबू लागवडीतून पर्यावरण संवर्धनाबरोबरच रोजगार निर्मिती व शाश्वत उत्पन्नाचे साधन निर्माण होईल, असे मत श्री. पटेल यांनी व्यक्त केले. वातावरण बदलाच्या संकटाला सामोरे जायचे असेल तर मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड होणं अत्यावश्यक आहे. बांबू लागवड ही त्यासाठी प्रभावी उपाय ठरू शकते. बांबू मातीची धूप रोखतो, भूजलस्तर टिकवतो आणि कार्बन शोषणाद्वारे हवामानातील बदल कमी करण्यास मदत करतो. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
पटेल पुढे बोलतांना म्हणाले,बांबू लागवड ही ‘हिरव्या अर्थव्यवस्थे’कडे जाण्याचा मार्ग आहे. प्रत्येक गावात मनरेगाच्या माध्यमातून बांबू संवर्धन दोन्ही साध्य होईल, अशा पद्धतीने नियोजन करणे आवश्यक आहे. बांबू हा पर्यावरणासाठी अत्यंत उपयुक्त व बहुउपयोगी वनस्पती आहे. बांबू हा ‘ग्रीन गोल्ड’ म्हणून ओळखला जातो. त्याच्या लागवडीमुळे मातीची धूप थांबते, भूजलस्तर टिकून राहतो आणि कार्बन शोषणाद्वारे हवामान बदलाचा परिणाम कमी करण्यासही मदत होते.बांबू मोठ्या प्रमाणात कार्बन शोषण करतो आणि ऑसिजन निर्मिती वाढवतो. मातीची धूप थांबवतो व भूजलस्तर स्थिर ठेवतो. हवामान बदलाच्या परिणामांना कमी करण्यात मदत करतो.बांबू हा ग्रीन गोल्ड म्हणून ओळखला जातो.
मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांनी सांगितले की, मनरेगा योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात बांबू लागवडीचे ठरवलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. प्रत्येक तालुयात ठरावीक उद्दिष्टानुसार लागवड, देखभाल आणि नोंदवही यावर विशेष भर देण्यात येणार आहे. गुणवत्तापूर्ण रोपे, योग्य सिंचन व देखरेख यामुळे बांबू लागवड उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
देवरे यांनी शेतकर्‍यांना या उपक्रमाशी जोडताना त्यांना मार्गदर्शन करणे, बांबूची बाजारपेठ (मार्केट लिंक) उपलब्ध करून देणे आणि विक्रीस चालना मिळावी यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.शेतकर्‍यांना प्रोत्साहित करून उत्पादनानंतर त्यांचे हित कसे जपावे आणि बांबूला मार्केटमधून योग्य भाव मिळावा याबाबत पटेल यांच्याशी चर्चा केली. बांबू लागवड ही रोजगारनिर्मिती, पर्यावरण संवर्धन आणि बाजारपेठीय साखळी निर्माण या तिन्ही गोष्टींना चालना देणारी ठरावी असे त्यांनी नमूद केले. बैठकीला लोकप्रतिनिधी, गटविकास अधिकारी,संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.