भारतासाठी धोकादायक! चीनचे रेअर अर्थ मिनरल्सवर नियंत्रण

रेअर अर्थ मिनरल्सवर चीनचे नियंत्रण वाढणार

    दिनांक :11-Oct-2025
Total Views |
चीन,
rare earth minerals जगभरातील हायटेक तंत्रज्ञानाच्या वाढत्या गरजांसाठी अत्यावश्यक असलेल्या रेअर अर्थ मिनरल्सच्या निर्यातीवर चीनने १ डिसेंबरपासून कठोर नियंत्रण आणण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यावरण रक्षण आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आल्याचे चीनने स्पष्ट केले असले तरी, यामुळे अमेरिका आणि इतर पाश्चिमात्य राष्ट्रांच्या तांत्रिक प्रगतीला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे.
 
 

rare earth minerals  
चीन सध्या जागतिक स्तरावर रेअर अर्थ मिनरल्सचा सर्वात मोठा उत्पादक आणि निर्यातदार देश असून, जगातील सुमारे ९० टक्के पुरवठा केवळ चीनच्या हातात आहे. याच पार्श्वभूमीवर, चीनकडून होणाऱ्या निर्यातीवर निर्बंध आल्यास भारतालाही याचा थेट परिणाम जाणवण्याची शक्यता आहे. सध्याच्या घडीला भारत आपल्या गरजेच्या सुमारे ६० टक्के रेअर अर्थ मिनरल्स चीनमधून आयात करतो.
चीनच्या या निर्णयाला उत्तर म्हणून अमेरिकेने चीनमधून आयात होणाऱ्या विविध वस्तूंवर १०० टक्के टॅरिफ लावण्याचा तडकाफडकी निर्णय घेतला आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार तज्ज्ञांच्या मते, हे पाऊल एका नव्या ‘रेअर अर्थ ट्रेड वॉर’च्या दिशेने वाटचाल करू शकते.
 
 
भारताच्या दृष्टीने rare earth minerals  ही स्थिती संकटासोबतच एक मोठी संधी देखील ठरू शकते. भारतात अनेक भागांमध्ये रेअर अर्थ मिनरल्ससह विविध क्रिटिकल मिनरल्स आढळतात. जम्मू-कश्मीरमधील रियासी भागात लिथियम, ओदिशा आणि केरळात रेअर अर्थ एलिमेंट्स, मध्य प्रदेशात कोळशाच्या खाणींमध्ये आणि राजस्थानमध्ये थोरियम व पायराइट्स, झारखंडमध्ये यूरेनियम, तर तामिळनाडू, कर्नाटक आणि राजस्थानमध्ये टंगस्टन आणि क्रोमाइट यांसारख्या महत्त्वपूर्ण खनिजांचे अस्तित्व आहे.वर्ष २०२२ मध्ये भारताने ऑस्ट्रेलियासोबत क्रिटिकल मिनरल्सच्या सहकार्याकरता एक महत्त्वाचा करार केला होता. या कराराअंतर्गत दोन्ही देश खाण उत्खनन आणि खनिज प्रक्रिया क्षेत्रात सहकार्य वाढवत आहेत. या घडामोडीमुळे भारताने देशांतर्गत खाणकामावर लक्ष केंद्रित करणे आणि स्वयंपूर्णता साधणे अत्यंत गरजेचे झाले आहे.
रेअर अर्थ rare earth minerals  मिनरल्सचा उपयोग स्मार्टफोन, संगणक, सौर पॅनल, पवन टरबाइन, इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटऱ्या, तसेच संरक्षण तंत्रज्ञानातील रडार प्रणाली, मिसाइल यंत्रणा आणि उपग्रहांमध्ये होतो. जागतिक स्तरावर क्लीन एनर्जीच्या दिशेने होत असलेल्या वाटचालीमुळे लिथियम, कोबाल्ट, निकलसारख्या खनिजांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.अशा परिस्थितीत, भारताने जर देशांतर्गत खनिज संसाधनांचा प्रभावी उपयोग केला आणि उत्पादन क्षमता वाढवली, तर सेमीकंडक्टर, डिफेन्स, एअरोस्पेस आणि रिन्युएबल एनर्जी या क्षेत्रांमध्ये स्वदेशी उत्पादनाच्या माध्यमातून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करू शकतो.चीनचा निर्णय हा एक प्रकारचा धोका असला, तरी भारतासाठी ही एक जागरूक होण्याची आणि जागतिक रेअर अर्थ मार्केटमध्ये स्वतःचे स्थान मजबूत करण्याची संधी आहे. यासाठी धोरणात्मक गुंतवणूक, संशोधन आणि खाण तंत्रज्ञानाचे आधुनिकीकरण आवश्यक ठरणार आहे.