स्वच्छ गावासाठी वाढदिवसाला ग्रामस्वच्छता व वृक्षारोपन

कालीमाटीच्या सरपंच सोनाली साखरे यांचा पुढाकार

    दिनांक :11-Oct-2025
Total Views |
गोरेगाव, 
Sonali Sakhare : तालुक्यातील कालीमाटी ग्रामपंचायतीच्या सरपंचा सोनाली गौतम साखरे यांनी आपला वाढदिवस ११ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानातंर्गत स्वच्छ गावासाठी स्वच्छता अभियान व वृक्षरोपन करून साजरा केला.
 
 
 
SONALI
 
 
 
सरपंच सोनाली साखरे यांच्या मार्गदर्शनात गावात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्यात येत आहे. विविध उपक्रम व कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वच्छता, पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून सरपंच साखरे यांनी आपला वाढदिवस ग्रामस्वच्छता व वृक्षरोपनाने साजरा केला. यानिमित्ताने गावात ठिकठिकाणी विविध प्रजातीच्या १०० रोपट्यांची लागवड करण्यात आली. तसेच गावातील सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी उपसरपंच सुभाष रांगले, ग्रामपंचायत सदस्य राजा कटरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ज्योती पटले, अंगणवाडी सेविका सुरेखा पटले, ग्राम रोजगार सहाय्यक जे. जी. पटले, शारदा भांडारकर, विजय चव्हाण तसेच गावकरी उपस्थित होते.