तभा वृत्तसेवा बाभुळगाव,
bullock cart rally, तालुका काँग्रेस कमेटीतर्फे विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर बैलबंडी मोर्चा नेण्यात आला. मागण्यांचे निवेदन तहसीलदार मीरा पागोरे यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आले.
बाजार समितीपासून मोर्चाला सुरुवात झाली. ओला दुष्काळ जाहीर करा, सातबारा कोरा करा, शेतकèयांना तातडीने मदत जाहीर करा आदी घोषणा देण्यात आल्या. मोर्चा तहसील कार्यालयावर पोहोचल्यानंतर प्रमुख वक्त्यांची भाषणे झाली. बाभुळगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकèयांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत जाहीर करा, शेतकèयांची विनाअट संपूर्ण कर्जमाफी करा, कापसाला प्रतिक्विंटल 10 हजार रुपये भाव द्या, सोयाबीनला 7 हजार आणि तुरीला 9 हजार रुपये प्रतिक्विंटल भाव द्यावा इत्यादी मागण्या केल्या.
यावेळी आमदार बाळासाहेब मांगुळकर, माजीमंत्री वसंत पुरके, काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अॅड. प्रफुल मानकर, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष वर्षा निकम, पंढरीनाथ पाटील, श्रीकांत कापसे, अमेय घोडे, अमोल कापसे, अक्षय राउत, मोहन बनकर, श्याम जगताप, मुकेश देशमुख, राजकुमार पत्रे, कैलास काळे, रमेश लोखंडे, विनोद वाटमोडे, प्रवीण वाईकर, प्रदीप नांदुरकर, अतुल राऊत, डॉ. रमेश महानूर, अतुल देशमुख, सतीश वानखडे, सय्यद जहीर, संकेत टोने, मोहन भोयर, दिनेश गुल्हाने, महिंद्र घुरडे, रितेश भरुड, अमोल कापसे, प्रज्वल राऊत, लाला राऊत, कृष्णा ठाकरे, सागर नावडे आदी उपस्थित होते.