तभा वृत्तसेवा उमरखेड,
umarkhed protest ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात उमरखेड तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी, पूर आणि पैनगंगा नदीच्या महापूरामुळे शेतकèयांचे, शेतमजुरांचे आणि नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पिके वाहून गेली, शेती खरडून गेली, घरे उद्ध्वस्त झाली आणि ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा काँग्रेसच्या नेतृत्वात बुधवार, 8 ऑक्टोबरला उमरखेड येथे भव्य धडक ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला.
हा मोर्चा कृषी उत्पन्न बाजार समिती येथून सुरू होऊन शिवाजी महाराज चौकमार्गे उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चात शेतकरी, पूरग्रस्त बांधव, बेरोजगार युवक व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले. शेतकèयांच्या हक्कांसाठी सरकारला जागे करण्यासाठी घोषणाबाजी करण्यात आली.मोर्चाचे नेतृत्व माजी मंत्री प्रा. वसंत पुरके, प्रदेश सरचिटणीस साहेबराव कांबळे, तातू देशमुख, राम देवसरकर, गोपाल अग्रवाल, सचिन नाईक, नंदकिशोर अग्रवाल, दत्तराव शिंदे, बाळासाहेब चंद्रे, सूर्यकांता दिंडाळकर, संभाजी नरवाडे, महेंद्र कावळे, ख्वाजा यांसह अनेक काँग्रेस पदाधिकाèयांनी केले. या मोर्चाला तालुक्यातील शेतकèयांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.
मोर्चादरम्यान शेतकèयांच्या प्रमुख मागण्या पुढे करण्यात आल्या ओला दुष्काळ तत्काळ जाहीर करावा, सर्व शेतकèयांची सरसकट कर्जमाफी करावी, हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई तत्काळ द्यावी, नदीकाठावरील खरडून गेलेल्या जमिनींसाठी हेक्टरी 1 लाख रुपयांची मदत, सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्प कायमचा रद्द, बेरोजगार युवकांना भत्ता व रोजगार, तसेच रबी हंगामासाठी मोफत बियाणे व खते देण्याची मागणी करण्यात आली.काँग्रेस नेत्यांनी इशारा दिला की, जर शासनाने तत्काळ मदत केली नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन उभारले जाईल. सरकारने झोपेतून जागे होऊन शेतकèयांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा करून त्यांना कर्जमुक्त करावे, असे आवाहन मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आले.