बुलढाणा, ११ ऑक्टोबर
Prataprao Jadhav : जून ते सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते . मात्र राज्य सरकारने जाहीर केलेल्या विशेष मदत पॅकेज मधून जिल्ह्यातील चार तालुके वंचित राहिले होते . केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी तात्काळ राज्याचे मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री आणि मदत व पुनर्वसनमंत्री यांच्याशी संपर्क साधुन ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली . नवीन सुधारीत परिपत्रक सरकारने निर्गमित केले . संपूर्ण बुलढाणा जिल्हा नैसर्गिक आपत्तीग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आला आहे .

जून ते सप्टेंबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील १३ तालुयांचे क्षेत्र बाधित झाले होते . शेतकर्यांच्या बांधावर जाऊन केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी अतिवृष्टी . ढगफुटी व पुरामुळे बाधित झालेल्या क्षेत्राची पाहणी केली होती . आपदगस्तांना तात्काळ मदत देण्याच्या सूचनाही संबंधित यंत्रणेला दिल्या होत्या . आणि सरकारकडेही यासंदर्भाची वस्तुस्थिती मांडली होती . राज्य शासनाच्या वतीने आपदग्रस्तांना मदत जाहीर करण्यात आली . यामध्ये राज्यतील २५३ तालुयांचा समावेश करण्यात आला होता त्यासंदर्भातील परिपत्रक ९ ऑटोबरला शासनाच्यावतीने निर्गमित करण्यात आले . यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील नऊ तालुयांचा समावेश नैसर्गिक आपत्तीग्रस्त क्षेत्र म्हणून करण्यात आला होता परंतु जिल्ह्यातील मेहकर ,लोणार या तालुयामध्ये १५ सप्टेंबरला जवळपास २१५ मि .मी पावसाची नोंद झाली होती .
या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतांचे व घरांचेही नुकसान झाले होते तसेच संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुयातही काही भागांमध्ये अतिवृष्टी झाली होती असे असतांना राज्य सरकारने जाहीर केलेल्या विशेष मदत पॅकेजमध्ये मेहकर लोणार जळगाव जामोद आणि संग्रामपूर हे तालुके वंचित राहिले होते काही तांत्रिक बाबींमुळे हे बाधित क्षेत्र वंचित राहिले असेल हे लक्षात आल्यानंतर केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, अजित पवार आणि राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली . बाधित क्षेत्र मदतीपासून वंचित राहिले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले . या सर्वांनी वस्तुस्थिती जाणून घेतली आणि राज्य सरकारने सुधारित परिपत्रक काढले . यामध्ये राज्यातील वंचित आपदग्रस्त क्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे .यात बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर लोणार संग्रामपूर आणि जळगाव जामोद या चारही वंचित तालुयांचा समावेश करण्यात आला आहे . त्यामुळे संपूर्ण बुलढाणा जिल्हाच नैसर्गिक आपत्ती क्षेत्रामध्ये नोंदला गेला आहे .केंद्र आणि राज्यातील सरकार हे जनतेच्या प्रतिक संवेदनशील आह. सर्व आपदग्रस्त शेतकर्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळणार आहे अशी माहिती केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्या जनसंपर्क झाल्यातून देण्यात आली आहे.