रोहतकचे एसपी नरेंद्र बिजर्निया यांना हटवले, सुरेंद्र सिंह यांनी पदभार स्वीकारला

    दिनांक :11-Oct-2025
Total Views |
चंदीगड,
IPS Y. Puran Singh हरियाणा आयपीएस वाय. पुरण सिंग यांच्या आत्महत्येप्रकरणी हरियाणा सरकारने शनिवारी मोठी कारवाई केली. रोहतकचे एसपी नरेंद्र बिजर्निया यांना हटविण्यात आले. पुरण कुमार यांना छळल्याचा आरोप असलेल्या डीजीपी शत्रुजित कपूरसह १४ अधिकाऱ्यांमध्ये बिजर्निया यांचा समावेश आहे. बिजर्निया यांच्या जागी आयपीएस सुरेंद्र सिंह भोरिया यांना रोहतकमध्ये एसपी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. या संदर्भात राज्यपालांनी आदेश जारी केले आहेत. बिजर्निया यांची अद्याप कुठेही नियुक्ती झालेली नाही.
 
 
IPS
 
 
यापूर्वी, आयपीएस पुरण कुमार यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पीजीआय येथे नेण्यात आला होता. कुटुंबियांनी याचा निषेध केला. त्यांनी सांगितले की पोलिसांनी त्यांच्या संमतीशिवाय मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी नेला. आरोपींवर कारवाई झाल्यानंतरच ते पोस्टमॉर्टम करण्याची परवानगी देतील.IPS Y. Puran Singh यावर, चंदीगड पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की आयपीएस यांच्या कुटुंबाच्या संमतीनंतरच पोस्टमॉर्टम प्रक्रिया पुढे नेली जाईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वाय पुरण कुमार यांचा मृतदेह प्रथम सेक्टर १६ च्या शवागारात ठेवण्यात आला होता आणि आता पोस्टमॉर्टमसाठी पीजीआय येथे नेण्यात आला आहे.