तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
Kishor Tiwari, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी राज्यातील पावसामुळे बाधित शेतकèयांसाठी 31,628 कोटी रुपयांचे मदत पॅकेज जाहीर केले. महाराष्ट्राचे प्रमुख शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी या निर्णयाचे स्वागत केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी पॅकेज घोषित करीत असताना सुमारे 1 कोटी हेक्टर शेतीची लागवड झाली त्याच्यापैकी राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 29 जिल्ह्यांमध्ये 68 लाख हेक्टरपेक्षा जास्त पिकांचे नुकसान झाले. मात्र उर्वरित जवळपास 20 लाख हेक्टरमध्ये प्रचंड नापिकी झाली असल्यामुळे त्यांचाही विचार विस्तारित पॅकेजमध्ये करावा, अशी विनंती त्यांनी केली आहे.
नुकसान भरपाई पॅकेजमध्ये 2,059 महसूल विभागांमधील 29 जिल्हे आणि 253 तालुके समाविष्ट आहेत. सरकारने राज्यात पूर आणि अतिवृष्टीमुळे 68 लाख हेक्टरपेक्षा जास्त पिकांचे नुकसान झाले आहे हे कबूल केले आहे. यावरून हे कृषी संकट अभूतपूर्व असून शेतकèयांची दिवाळी गोड करण्याची विनंती किशोर तिवारी यांनी केली. या मदत पॅकेजमध्ये हेक्टरी 47 हजार रुपये रोख आणि मनरेगाद्वारे अतिरिक्त 3 लाख रुपये मदत समाविष्ट असेल. मुसळधार पावसामुळे शेतकèयांचे नुकसान झाले आहे. ग्रामीण भागातील पशुधन, घरे आणि सार्वजनिक पायाभूत सुविधांचे नुकसान झाले आहे. काही लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर काही जण जखमी झाले आहेत.
सरकारन उद्ध्वस्त घरे पुनर्बांधणीसाठी आणि नुकसानग्रस्त दुकानदारांना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली. त्यामध्ये पूरग्रस्त घरे पुनर्बांधणीसाठी आम्ही मदत करू हे आश्वासन ठोस नसून तत्काळ मदत अपेक्षित आहे. तर नुकसान झालेल्या दुकानदारांना 50,000 रुपयांची मदत आणि पशुधनामुळे झालेल्या नुकसानीची भरपाईसुद्धा अपुरी असल्याचे त्यांनी म्हटले आहे . शेतकèयांना येणाèया आर्थिक आणि मानसिक त्रासाची पूर्णपणे भरपाई कोणीही करू शकत नाही, या देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाशी मी सहमत आहे. मात्र भ्रष्ट सनदी अधिकारी व सडलेली प्रशासकीय यंत्रणा यामुळे दिलेली मदतही शेतकèयांच्या खात्यात येत नाही, त्यामुळे आमदारांना ही जबाबदारी देण्याची मागणी किशोर तिवारी यांनी केली आहे.