नागपूर,
Kojagiri Purnima- कोजागिरी पौर्णिमेनिमित्त ‘मैत्र’ समूहातर्फे ‘काव्यसंध्या’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे बाहेरगावी असणाऱ्या सदस्यांसाठी ऑनलाईन, तर प्रत्यक्ष उपस्थित राहू इच्छिणाऱ्या रसिकांसाठी ऑफलाईन अशा दुहेरी स्वरूपात तो घेण्यात आला.प्रारंभी मैत्र च्या प्रमुख डॉ. अरुंधती वैद्य यांनी आश्विन महिन्याचे वेगळेपण, ऋतूबदल आणि ‘को जागर्ति’ या प्रश्नाचे मर्म स्पष्ट केले. ऑनलाईन सत्रात नेदरलँड्सहून श्रुती वैद्य हिने विजया संगवई यांची ‘आला आश्विन आश्विन’ ही कविता सादर केली. गौरी सरनाईक यांनी ‘अजून आठवतो तो चंद्रमा’ ही स्वरचित प्रेमकविता सादर केली, तर रेवती जोशी अंधारे यांनी त्यांना भावलेली कविता वाचली.
ऑफलाईन सत्रात अनुजा तातावार यांनी ‘कोजागरी’, डॉ. नूतन देव यांनी ‘आश्विन का महिना’, निमा बोडखे यांनी ‘माहेर’ आणि कोजागरीच्या शुभेच्छा देणाऱ्या कविता सादर केल्या.Kojagiri Purnima डॉ. वृंदा जोगळेकर यांनी ‘चांदण्यांचे कवडसे’, तर डॉ. अरुंधती वैद्य यांनी ‘आश्विन येता’ या कवितेद्वारे ‘को जागर्ति’ या प्रश्नाचा अर्थ प्रभावीपणे मांडला.कार्यक्रमात अजय वैद्य यांनी ‘धीरे धीरे चल चांद गगन में’ हे गीत सादर केले, तर त्यांनी व डॉ. वृंदा जोगळेकर यांनी ‘नवीन आज चंद्रमा, नवीन आज यामिनी’ हे द्वंद्वगीत सादर केले.सूत्रसंचालन डॉ. अंजली भांडारकर यांनी केले.
सौजन्य:डॉ. अरुंधती वैद्य,संपर्क मित्र