दिवाळीपूर्वी बहिणीसाठी सरकारकडून 'या' योजनेतून आर्थिक मदत!

करण्यात आली मोठी घोषणा

    दिनांक :11-Oct-2025
Total Views |
मध्य प्रदेश,
Ladli Behna Yojana मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी मध्य प्रदेशच्या उन्हेल येथे झालेल्या कार्यक्रमात शेतकऱ्यांसाठी दिलासा देणाऱ्या महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, राज्य सरकार कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे आणि आपत्तीग्रस्त प्रत्येक शेतकऱ्याला मदत करण्यात येईल. एकेक शेताचे सर्वेक्षण करण्यात आले असून, नुकसान झालेल्या पिकांसाठी शेतकऱ्यांना तात्काळ मदत दिली जात आहे. यासोबतच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना भावांतर योजनेचा लाभ मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
 
 

Ladli Behna Yojana  
या कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. यादव यांच्या हस्ते 133 कोटी 80 लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आले. यामध्ये इंगोरिया ते उन्हेल या 23 किलोमीटर लांबीच्या दोन मार्गिकेच्या (टू लेन) सडकेच्या 127.63 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचा समावेश आहे. त्याचप्रमाणे 1.26 कोटी रुपयांच्या नवीन नगर परिषद कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम, 2.17 कोटींच्या चिडी ते रावदिया मार्गाचे भूमिपूजन आणि 2.74 कोटी रुपयांच्या करनावद विद्युत उपकेंद्राचे लोकार्पण देखील करण्यात आले.
 
 
मुख्यमंत्री यादव यांनी आपल्या भाषणात उन्हेल परिसराच्या सर्वांगीण विकासावर भर दिला. त्यांनी घोषीत केले की, उन्हेल प्राथमिक आरोग्य केंद्राचे सामुदायिक आरोग्य केंद्रात रूपांतर करण्यात येईल. रामगढ बिहारिया मार्गावरील नारायणधामला जोडण्यासाठी पुलाचे बांधकाम आणि विश्रामगृहाची उभारणी देखील करण्यात येणार आहे. याशिवाय, इमली व मावा उद्योगाशी संबंधित व्यावसायिकांसाठीही विशेष विकास कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत.
 
 
यावेळी बोलताना Ladli Behna Yojana मुख्यमंत्री यादव यांनी गंभीर नदी प्रकल्पाचा लाभही या परिसरातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना मिळणार असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांच्या आर्थिक हितासाठी भावांतर योजना सुरू करण्यात आली असून, या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना घरबसल्या लाभ दिला जाईल. नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना सन्मान निधी आणि मदतीचे वाटप सुरू आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून मिळणाऱ्या अहवालांच्या आधारे तात्काळ निधी वितरीत करण्यात येत आहे.
 
 
लाडली बहना...
याचवेळी मुख्यमंत्री यांनी गोपालन गौशाळा योजनेतून २५ देशी गायींच्या संगोपनासाठी ४० लाख रुपयांच्या प्रकल्पांपैकी १० लाख रुपये अनुदान शासनाकडून दिले जाणार असल्याचे जाहीर केले. दिवाळीपूर्वी ‘लाडली बहना’ योजनेंतर्गत लाभार्थी महिलांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. गोवर्धन पूजा राज्यभर साजरी केली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमात खासदार अनिल फिरोजिया यांनी मुख्यमंत्री डॉ. यादव यांच्या नेतृत्वाखाली राज्यात शेतकरीहिताच्या विविध योजना राबवल्या जात असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांना केवळ मुआवजा नव्हे, तर विमा दावा रकमेचाही लाभ दिला जाईल. आमदार सतीश मालवीय यांनी परिसराला विकासाच्या नव्या वाटा मिळत असल्याचे सांगत मुख्यमंत्री यादव यांचे आभार मानले.कार्यक्रमात उपस्थित शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांचा सत्कार केला आणि शेतकरीहितासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना पारंपरिक 'हल' भेट देत आपला सन्मान व्यक्त केला. मुख्यमंत्री यांनीही उपस्थित नागरिकांना विकासाच्या वाटेवर राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले.