मंगरुळनाथ, रिसोड, मालेगाव तालुयाचा अतिवृष्टीत समावेश

आ. श्याम खोडे यांचा पुढाकार

    दिनांक :11-Oct-2025
Total Views |
मंगरूळनाथ,
Shyam Khode वाशीम जिल्ह्यातील मंगरूळनाथ,रिसोड व मालेगाव तीन तालुके जून ते सप्टेंबर २०२५ मधील अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधित असूनही जाहीर विशेष मदत पॅकेज व सवलतीतून वगळण्यात आलेल्या संदर्भात उक्त तालुयावर झालेला अन्याय दूर करण्याबाबत आमदार श्याम खोडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेशी भ्रमणध्वनी वरून संपर्क साधला.
 
 

Shyam Khode
या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे मोठ्या प्रमाणात आपत्ती ओढवली होती. या आपत्तीमुळे शेतकर्‍यांचे शेतीपिक, फळबाग, भाजीपाला पिके तसेच शेतजमीनींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक ठिकाणी विहिरी, शेती बांध, घरांची पडझड, घरगुती वस्तूंचे नुकसान, जनावरांचे मृत्यू अशा प्रकारचे व्यापक नुकसान झाले आहे. उक्त तिन्ही तालुयांतील शेतकर्‍यांना दुबार व तिबार पेरणी करावी लागल्याने आर्थिकदृष्ट्या मोठा फटका बसला आहे. तरी देखील एवढ्या तीव्र आपत्तीनंतरही मंगरूळनाथ रिसोड व मालेगाव तालुके शासनाने जाहीर केलेल्या विशेष मदत पॅकेज व सवलतीच्या लाभातून संदर्भीय शासन निर्णयातून वगळले गेले होते. ही अत्यंत अन्यायकारक बाब होती वरील तिन्ही तालुयातील शेतकरी शासनाच्या मदतीच्या निर्णयाकडे आशेने पाहत होते. परंतु, मदतीपासून वंचित राहिल्याने व शासन निर्णयातील दिलेले निकष सदर तालुके पूर्ण करीत असतांना वगळण्यात आले, अशी माहिती आमदार श्याम खोडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भ्रमणध्वनीवरून दिली.
 
 
मुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील श्याम खोडे यांच्या भ्रमणध्वनीवर तीनही तालुयाचा आपत्तीग्रस्तांमध्ये समावेश करून विशेष मदत पॅकेज व सवलतीचा लाभ देण्यात येणार असे शुद्धीपत्र निर्गमित करण्यात येईल असे आश्वासन दिले. आ. श्याम खोडे यांनी तिन्ही तालुयात शेतकर्‍यांना आर्थिक मदत खेचून आणली.आमदार श्याम खोडे सर्वत्र त्यांचे शेतकर्‍यांकडून कौतुक होत आहे.