नागपूर,
Deendayal Shodh Sansthan दीनदयाल शोध संस्थान, बालजगत येथे दिनांक ११ ऑक्टोबरला भारतरत्न नानाजी देशमुख यांच्या जयंतीनिमित्त प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ प्रचारक रवीजी भुसारी उपस्थित होते. आपल्या भाषणात रवीजींनी सांगितले की, नानाजींनी संपूर्ण जीवन देशकार्याला अर्पण केले.“डॉ. हेडगेवार यांनी तयार केलेल्या माळेतील मेरुमणी म्हणजेच नानाजी देशमुख. परमपूज्य गुरुजींनी श्यामाप्रसाद मुखर्जी यांना दिलेल्या पंचरत्नांमध्ये नानाजी देशमुख यांचा समावेश होता,” हे त्यांनी अधोरेखित केले.ते पुढे म्हणाले, नानाजींचे संबंध टाटा-बिर्ला यांच्याइतकेच झोपडीत राहणाऱ्या सामान्य माणसाशीही घट्ट होते. वयाच्या ६० व्या वर्षी त्यांनी राजकारण सोडून सामाजिक कार्यासाठी स्वतःला समर्पित केले. मृत्यूनंतर त्यांनी देहदानही केले न भूतो न भविष्यती असे त्यांचे कार्य होते, या शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे संचालन व पाहुण्यांचा परिचय बालजगत सचिव संजय भाकरे यांनी केला, तर स्वागत बालजगत अध्यक्ष अभिनंदन पळसापुरे यांनी केले.नानाजी देशमुख यांची नातसून अपूर्वा नाईक हिने भावपूर्ण संघगीत सादर केले.दीनदयाल शोध संस्थानचे राष्ट्रीय सचिव निखिल मुंडले म्हणाले, Deendayal Shodh Sansthan बालजगत हे नानाजींच्या संकल्पनेतून साकार झाले असून, सेवा वस्तीतून आलेल्या मुलांमध्ये संस्कार घडवून त्यांना देशाचे जबाबदार नागरिक बनविणे हा संस्थेचा उद्देश आहे.कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्ष अभिनंदन पळसापुरे यांनी पाहुण्यांचे आभार मानत बालजगत नव्या रूपात पुढे नेण्यासाठी सातत्याने प्रयत्न राहतील, असे आश्वासन दिले.या कार्यक्रमाला लेखक उदयन ब्रम्ह, बालजगत उपाध्यक्ष पंकज महाजन, मीरा खडक्कार, छाया गाडे, उत्तरा नवरे, अशोक काशीकर, अशोक शेवडे, प्रशांत अत्रे तसेच बालजगतचे कार्यकर्ते उपस्थित होते.
सौजन्य:सायली जतकर,संपर्क मित्र