ऐतिहासिक दिवस! शेतकऱ्यांच्या पदरी आणखी 'दोन' योजना

पंतप्रधान मोदी यांची घोषणा

    दिनांक :11-Oct-2025
Total Views |
नवी दिल्ली
Narendra Modi दिवाळीच्या पार्श्वभूमीवर देशातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून मोठी दिलासादायक घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शनिवार) 'डाळ स्वावलंबन अभियान' आणि 'पंतप्रधान धन-धान्य कृषी योजना' या दोन महत्वाकांक्षी योजनांची घोषणा केली. या योजनांसाठी सरकारने एकूण ३५,४४० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, यामुळे देशातील कृषी क्षेत्रात मोठा बदल घडून येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
 

 Narendra Modi  
ही घोषणा समाजवादी नेते जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीनिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात करण्यात आली. या कार्यक्रमात मोदींनी कृषी, पशुपालन, मत्स्यपालन आणि अन्नप्रक्रिया क्षेत्राशी संबंधित ५,४५० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन केले. याशिवाय, ८१५ कोटींच्या इतर प्रकल्पांची पायाभरणीही पंतप्रधानांच्या हस्ते पार पडली.
 
 
 
डाळ स्वावलंबन अभियान
 
 
या योजनेसाठी Narendra Modi ११,४४० कोटी रुपयांचा निधी निश्चित करण्यात आला आहे. सरकारचे उद्दिष्ट २०३०-३१ पर्यंत देशातील डाळींचे उत्पादन सध्याच्या २५.२३८ दशलक्ष टनांवरून ३५ दशलक्ष टनांपर्यंत वाढवण्याचे आहे. डाळींसाठी भारत मोठ्या प्रमाणात आयातीवर अवलंबून आहे आणि हे अवलंबित्व कमी करण्यासाठीच ही योजना राबवली जाणार आहे. डाळींच्या स्वयंपूर्णतेच्या दिशेने सरकारचा हा एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.
पंतप्रधान धन-धान्य कृषी योजना
या योजनेसाठी Narendra Modi केंद्र सरकारने २४,००० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामार्फत कृषी क्षेत्रात मागासलेले १०० जिल्हे निवडून त्यांचा सर्वांगीण विकास केला जाणार आहे. योजनेचा उद्देश पीक उत्पादन वाढवणे, पीक विविधीकरणाला प्रोत्साहन देणे, सिंचन आणि जलसाठवण क्षमतेत सुधारणा करणे तसेच शेतकऱ्यांना सुलभ कर्जसुविधा उपलब्ध करून देणे हा आहे. ही योजना येत्या रब्बी हंगामापासून सुरु होणार असून २०३०-३१ पर्यंत राबवली जाणार आहे.या कार्यक्रमात मोदींनी बेंगळुरू आणि जम्मू-काश्मीरमधील कृत्रिम रेतन प्रशिक्षण केंद्रांचे उद्घाटन केले. तसेच, अमरेली आणि बनासमधील उत्कृष्टता केंद्रे, आसाममधील आयव्हीएफ प्रयोगशाळा, मेहसाणा, इंदूर आणि भिलवाडा येथील दूध पावडर प्लांट आणि तेजपूरमधील मत्स्य प्रकल्प यांचाही समावेश होता.पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत निवडलेल्या शेतकऱ्यांना सन्मानित केले. पीएम किसान समृद्धी केंद्रे आणि कॉमन सर्व्हिस सेंटर्स यांना प्रमाणपत्रे देण्यात आली. त्यांनी देशभरातील विविध राज्यांतील शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला आणि शेती, पशुपालन, मत्स्यपालन क्षेत्रात निर्माण होणाऱ्या मूल्य साखळीबद्दल चर्चा केली.या कार्यक्रमाला केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान, मत्स्य व पशुसंवर्धन मंत्री राजीव रंजन सिंह आणि कृषी राज्यमंत्री भागीरथ चौधरी हे देखील उपस्थित होते.या योजनांमुळे देशातील शेतकरी अधिक सक्षम होणार असून, कृषी अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांना मिळालेली ही योजना निश्चितच एक गोड बातमी ठरणार आहे.