नागपूर,
Sanskrit Language Pracharini Sabha संस्कृत भाषा प्रचारिणी सभा आणि विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रविज्ञान संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने “भारतीय ज्ञान प्रणाली आणि संस्कृत” या विषयावर द्विदिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. उद्घाटन समारंभ ११ ऑक्टोबर रोजी व्ही.एन.आय.टी.च्या मॅक सभागृहात पार पडला.परिषदेचे उद्घाटन डॉ. पंकज चांदे यांच्या हस्ते झाले. डॉ. उज्ज्वला चक्रदेव, डॉ. प्रेमलाल पटेल, डॉ. श्रीनिवास वरखेडी, आणि डॉ. लीना रस्तोगी व्यासपीठावर उपस्थित होते.समारंभाची सुरुवात दीपपूजन, वेदमंत्र पठण, तुलसीपूजन आणि सरस्वती वंदनेने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. चंद्रगुप्त वर्णेकर यांनी केले.

व्ही.एन.आय.टी.च्या मानव्यशास्त्र विभागाचे अध्यक्ष डॉ. योगेश देशपांडे यांनी संस्थेचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन डॉ. प्रगती वाघमारे यांनी केले, तर डॉ. स्मिता होटे यांनी ऋणनिर्देशन केले.Sanskrit Language Pracharini Sabha अभ्यागतांचा परिचय संस्कृत विभाग प्रमुख डॉ. कल्याणी काळे यांनी करून दिला.डॉ. चांदे यांनी भारतीय ज्ञान परंपरेचा प्राचीन आणि समृद्ध इतिहास सांगितला, तर डॉ. वरखेडी यांनी संस्कृत भाषेतील सर्वव्यापी ज्ञानावर भर दिला.डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांनी भारतीय स्थापत्य आणि संस्कृतीविषयक ग्रंथांचा उल्लेख करत एस.एन.डी.टी. विद्यापीठातील उपक्रमांची माहिती दिली.
समारंभात डॉ. प्रसाद देशपांडे यांना “प्रज्ञाभारती संस्कृत युवसारस्वत पुरस्कार” प्रदान करण्यात आला.सभेने अमृत महोत्सवानिमित्त ७५ पुस्तके प्रकाशित करण्याचा संकल्प केलाSanskrit Language Pracharini Sabha असून, त्यापैकी २५ पुस्तकांचे आणि ‘स्वस्ति’ पोर्टलचे प्रकाशन करण्यात आले.या परिषदेसाठी संपूर्ण भारतातून १८० प्रतिनिधी सहभागी झाले असून, ८५ शोधनिबंध सादर केले जाणार आहेत.
सौजन्य अनघा आंबेकर,संपर्क मित्र