बेसातील प्रमिला प्रकाश हाॅटेलमध्ये देहव्यवसाय

देहव्यापार करणाèया तीन युवतींची सुटका : दाेन आराेपी ताब्यात

    दिनांक :11-Oct-2025
Total Views |
अनिल कांबळे


नागपूर,
sex racket शहरात अनेक ब्युटीपार्लर, पंचकर्म, मसाज पार्लर, स्पा आणि लाॅजवर देहव्यापार सुरु असताे. मात्र, आता देहव्यापार चक्क नामांकित हाॅटेलमध्ये व्हायला लागला. बेसा पसिरातील प्रमिला प्रकाश हाॅटेलमध्ये हा व्यवसाय राजराेसपणे सुरू हाेता. पाेलिसांनी हाॅटेलमध्ये टाकलेल्या छप्यात तीन युवती देहव्यापार करताना आढळल्या. त्या युवतींकडून देहव्यवसाय करवून घेणाèया महिलेसह तिच्या साथिदाराला पाेलिसांनी ताब्यात घेतले. कांचन (28, गाेळीबार चाैक), दीपक हेमंतकुमार शुक्ला, (21, संत ताजुद्यीन बाबानगर, बेसा राेड) अशी आराेपींची नावे आहेत.
 

sex racket 
पाेलिस आयुक्त डाॅ. रवींद्रकुमार सिंगल यांनी शहरातील अवैध धंदे बंद करण्यासाठी विविध उपक्रम राबवणे सुरु केले आहे. यात ‘ऑपरेशन शक्ती’ अंतर्गत गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभाग, बेलतराेडी पाेलिस व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाचे अधिकारी व अंमलदारांना प्रमिला प्रकाश हाॅटेलमध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती मिळाली. गुरूवारी पथकाला बेसा पसिरातील प्रमिला प्रकाश हाॅटेल, प्लाॅट नंबर 10, डाेबीनगर येथे छापा टाकला. छाप्यात आराेपी कांचन निमजे आणि दीपक शुक्ला हे दाेघे पीडित युवतींना झटपट पैसे कमविण्याचे आमिष दाखवून देहव्यवसाय करवून घेत हाेते. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या युवतींना हेरण्याचे काम कांचन करीत हाेती. त्या युवतींना पैसे आणि काम देण्याचे आमिष दाखवायची. कमी वेळात अधिक पैसे मिळतात, असे बाेलून आराेपी युवतींना देहव्यवसायासाठी बळजबरी करीत हाेती. युवतींना देहव्यवसायाकरिता हाॅटेलमध्ये ग्राहक आणि जागा उपलब्घ करून देत हाेते. दरम्यान, कारवाईत पाेलिसांनी आराेपींच्या ताब्यातून तीन पीडित युवतींची सुटका करीत 5 हजार 400 रुपयांची राेख, तीन माेबाईल तसेच इतर साहित्य मिळून 67 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आराेपींविरूद्घ गुन्हा दाखल करीत पाेलिसांनी जप्त मुद्देमालासह त्यांना बेलतराेडी पाेलिसांच्या ताब्यात दिले.