शुबमनचा दहावा विक्रमी शतक पूर्ण ...

गौतम गंभीरचा विक्रम मोडीत काढला

    दिनांक :11-Oct-2025
Total Views |
नवी दिल्ली,
Shubman Gill 10th century टीम इंडियाचा युवा फलंदाज आणि सध्याचा कसोटी कर्णधार शुबमन गिल याने वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात दमदार शतक झळकावत आपली उत्कृष्ट फॉर्म पुन्हा सिद्ध केली आहे. अरुण जेटली स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात शुबमनने कसोटी कारकीर्दीतील दहावे शतक पूर्ण करत भारताचा माजी फलंदाज आणि सध्याचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरचा विक्रम मागे टाकला.
 
 

Shubman Gill 10th century 
दुसऱ्या दिवशी खेळताना भारतीय डावातील 130 व्या षटकात शुबमनने पाचव्या चेंडूवर तीन धावा घेत आपलं शतक पूर्ण केलं. हे शतक त्याने 177 चेंडूंमध्ये 57.63 च्या स्ट्राईक रेटने पूर्ण केलं. या खेळीत त्याने 13 चौकार आणि 1 षटकार लगावत मैदानावर आपली ठसठशीत उपस्थिती दर्शवली.
 
 
शुबमनने याआधी कसोटी क्रिकेटमध्ये एकूण नऊ शतकं झळकावली होती. मात्र, वेस्ट इंडिजविरुद्धच्या या सामन्यातील शतकाच्या जोरावर त्याने गौतम गंभीरच्या नऊ शतकांचा विक्रम मोडून कसोटी क्रिकेटमध्ये दहावं शतक पूर्ण केलं आहे. विशेष म्हणजे, कर्णधार म्हणून त्याचं हे पाचवं शतक ठरलं असून, तो आता भारतीय कसोटी क्रिकेटमधील युवा कर्णधारांमध्ये आघाडीवर आहे.
 
 
या शतकामुळे शुबमन गिलने केवळ वैयक्तिक कामगिरीत भर घातली नाही, तर संघालाही मजबूत स्थितीत नेलं आहे. फलंदाजीदरम्यान त्याने संयम, तंत्र आणि आक्रमकता यांचा सुरेख मेळ साधत प्रेक्षकांची मनं जिंकली.शुबमनची ही खेळी भारतासाठी केवळ एक मोठी धावसंख्या उभारण्याच्या दृष्टीने महत्त्वाची नाही, तर येत्या सामन्यांसाठी आत्मविश्वास वाढवणारीही ठरणार आहे. त्याच्या या कामगिरीमुळे भारतीय संघ व्यवस्थापन आणि चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.सध्या सुरू असलेल्या मालिकेत शुबमनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिली कसोटी गमावल्यानंतर दुसऱ्या सामन्यात पुनरागमन केलं असून, त्याच्या या शतकामुळे भारताच्या विजयाच्या आशा अधिक बलवत्तर झाल्या आहेत.