सिंदी (रेल्वे),
Soybean procurement center, अडचणीत सापडलेल्या शेतकर्यांना उभारी देण्यासाठी सरकार पिवळे सोने खरेदी करण्यासाठी जुळवाजुळव करीत आहे. त्या अनुषंगाने दुसरी बैठक जिल्हा पणन अधिकार्यांच्या अध्यक्षतेत शुक्रवार १० रोजी पार पडली. मात्र, अतिवृष्टीमुळे सोयाबीनच्या उत्पन्नाची सरासरी आणि हमीभाव मिळण्याची शयता धूसर आहे.
ऐन उमेदीच्या काळात या पिकावर यलो मोझॅक आणि चारकोल रॉटने हल्ला केला. परिणामी, १०० शेंगांची अपेक्षा असणार्या झाडांना आज फत दहा-बारा शेंगा दिसत आहेत. त्यादेखील दोन किंवा तीन दाण्यांच्याच! अशा परिस्थितीत शेतकर्यांकडे सरासरी उत्पन्न येण्याची शयता नाही.
शासनाने सोयाबीनचा हमीभाव ५ हजार ३२८ रुपये जाहीर केला. परंतु, सोयाबीनची पत आणि हमीभावाची सांगड घालताना पणन महासंघाच्या ग्रेडर आणि अधिकार्यांची तारांबळ उडणार आहे. जिल्हा पणन अधिकारी आणि जिल्ह्यातील आठही बाजार समितीचे व खविसचे प्रतिनिधी सोयाबीनची खरेदी करण्याची तयारी करीत असले तरी नाव नोंदविण्यासाठी शेतकरी अनुत्सुक राहण्याची शयता बळावत आहे. सरकारने नापिकीच्या पृष्ठभूमीवर सोयाबीनच्या हमीभावात किमान १हजार रुपयांची वाढ करावी, अशी शेतकर्यांची मागणी आहे. या भागात २६ हजार एकरात सोयाबीनची पेरणी झाली आहे. परंतु, अद्याप सोयाबीनची कापणी सुरू झाली नाही. नगदी चुकारा देणार्या सोयाबीनचे पैसे दिवाळीपूर्वी शेतकर्यांच्या हातात पडेल, अशी स्थिती आज दिसत नाही. त्यामुळे शेतकर्यांची दिवाळी अंधारात जाईल, अशी चिन्हं आहेत.