कारंजा लाड,
Karanja Lad traffic issues अलीकडच्या काळात कारंजा शहरात व परिसरात अनेक अल्पवयीन मुलांसह विद्यार्थी दुचाकीस्वार भरधाव वेगाने वाहन चालवत असल्याचे दिसून येत आहे. अशा वेळी नियंत्रण सुटल्याने गंभीर अपघात होण्याची शयता वाढते. त्यामुळे विद्यार्थी जीवन धोयात येऊ नये म्हणून वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्यासाठी याकडे वाहतूक पोलिसांनी लक्ष देण्याची गरज आहे.
शाळा व महाविद्यालयीन वयातील युवकांमध्ये दुचाकी चालविण्याची स्पर्धा आणि वेगाची आवड वाढत आहे. परंतु या निष्काळजीपणामुळे स्वतःचे तसेच इतरांचे प्राण धोयात येतात. अशा घटना टाळण्यासाठी पोलीस प्रशासन आणि वाहतूक विभागाने विशेष लक्ष देऊन प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. पालकांनी आपल्या मुलांना दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करण्याची सवय लावावी, तसेच वेगमर्यादा पाळण्याचे शिक्षण द्यावे. वाहन परवाना नसताना दुचाकी चालविणे हे कायद्याने गुन्हा आहे, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावे. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करता, त्यांचा अपघात होऊन त्यांना इजा, अपंगत्व किंवा मृत्यू ओढवू नये, हीच अपेक्षा आहे. त्यामुळे सर्व संबंधित विभाग, शाळा, महाविद्यालय प्रशासन तसेच पालकांनी एकत्र येऊन याबाबत जनजागृती करणे अत्यावश्यक आहे.