आमदार वानखेडे यांची ‘आत्मनिर्भर गाव’ ध्येयावर कृतीशील भूमिका

आर्वीत समृद्ध पंचायतराज कार्यशाळा

    दिनांक :11-Oct-2025
Total Views |
आर्वी,
Sumit Wankhede मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची उद्दिष्ट्य गाठण्यासाठी आमदार सुमित वानखेडे यांनी कृतीशील भूमिका घेतली आहे. या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आर्वी येथील पंचायत समिती सभागृहात तालुकास्तरीय आढावा बैठक आणि कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. गावांना आत्मनिर्भर बनवण्याचा ध्यास घेत आमदार वानखेडे यांनी यावेळी थेट कृती आराखडा तयार करण्याचे आणि अभियानाचे ध्येय वेळेत साधण्याचे स्पष्ट निर्देश दिले. हे अभियान आत्मनिर्भर गाव, सुशासन, लोकसहभाग आणि गावांचा सर्वांगीण विकास साधणे या प्रमुख उद्दिष्टांवर आधारित आहे.
 
 
Sumit Wankhede



ग्रामपंचायतींना सक्षम आणि पारदर्शक बनवण्याचे निर्देश
 
 
 
या बैठकीत आमदार वानखेडे यांनी गावांचा विकास केवळ सरकारी निधीवर अवलंबून न राहता, स्थानिक संसाधने आणि लोकसहभाग यातून झाला पाहिजे, या मुख्य तत्त्वावर जोर दिला. गावांमध्ये लोकसहभागाची चळवळ उभी करण्यावर, विकासाची निकोप स्पर्धा निर्माण करण्यावर आणि विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यावर विशेष भर दिला. या बैठकीत त्यांनी सुशासन, उपजीविका विकास, सामाजिक न्याय, स्वनिधीतून सक्षम पंचायत, जलसमृद्ध व हरित गाव, आणि सौर ऊर्जा यासारख्या अभियानाच्या प्रमुख उद्दिष्टांसाठी योजनांच्या अंमलबजावणीवर चर्चा केली.
 
 
 
 
 
आमदार वानखेडे यांनी अभियानाचे उद्दिष्ट साधण्यासाठी मनरेगा, ग्रामनिधी व इतर योजनांचे अभिसरण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच गावपातळीवरील संस्थांचे सक्षमीकरण करण्यासाठी शाळा, अंगणवाडी, पशुवैद्यकीय उपचार केंद्र, स्मशानभूमी, व्यायामशाळा यासारख्या उपक्रमांना प्राधान्य देण्याचेही निर्देश दिले. अमोनियम मुत गाव, सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन आणि श्रमदानातून जनचळवळ निर्माण करणे यासारख्या उपक्रमांच्या माध्यमातून गावाचा सर्वांगीण विकास साधता येईल. प्रत्येक ग्रामपंचायतीला सक्षम आणि पारदर्शक बनवण्यासाठी सर्व ग्रामसेवक, सरपंच व पदाधिकार्‍यांनी विकास आराखडा तयार करून मूल्यांकन निकषांनुसार कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
 
 
 
 
मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत हे अभियान मतदारसंघात प्रभावीपणे राबवण्याचा आपला निर्धार त्यांनी व्यत केला. पंचायत समिती अधिकारी, ग्रामसेवक आणि परिसरातील सरपंचांच्या लक्षणीय उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यशाळेमुळे ग्रामीण विकासाला नवी गती मिळेल आणि उद्दिष्टपूर्ती शय होईल, असा विश्वास यावेळी व्यत करण्यात आला.