तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
Vidarbha Sahitya Sammelan विदर्भ साहित्य संघ शाखा जांब आणि ईश्वर फाऊंडेशन दिग्रस यांच्या संयुक्त विद्यमाने 1 आणि 2 नोव्हेंबर रोजी आयोजित 69 व्या साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे शनिवार, 11 ऑक्टोबरला जांब येथे प्रकाशन करण्यात आले.
जांब येथील शेतकरी सहदेव मेश्राम आणि अनसूया मेश्राम यांच्या हस्ते येथील ख्यातनाम कलावंत बळी खैरे व राजु बिदरकर यांनी तयार केलेया या बोधचिन्हाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी शेतात सोयाबीन कापणाèया शेतकरी, शेतमजुरांनी या प्रकाशन सोहळ्यात मोठ्या आनंदाने भाग घेतला.
कष्टकरी शेवटच्या माणसापर्यंत साहित्याचा विचार पोहोचला पाहिजे. परिवर्तनाचा विचार त्याच्या धुèयापर्यंत गेला पाहिजे, हा या साहित्य संमेलनाच्या आयोजनामागील हेतू असल्याचे या निमित्ताने दिसून आले. या संमेलनासाठी जांब, यवतमाळसह आजूबाजूच्या ग्रामीण भागातील युवक कामाला लागले असल्याचे पाहायला मिळाले.
या प्रकाशनसमयी ईश्वर फाऊंडेशनचे प्रतिनिधी तथा संमेलनाचे मुख्य आयोजक हेमंत कांबळे, कार्याध्यक्ष मनोहर शहारे, आयोजन समितीचे पुरुषोत्तम टिचुकले, जनार्दन राठोड, शेतकरी राहुल परचाके, राजू माघाडे, हरीश वाघाटे, उमेश परचाके, शारदा माघाडे, राजू पटेल, वर्षा पारधी, रेखा पेंदाम उपस्थित होते.