आणि ग्रॉऊंडवर शुभमनवर भडकला यशस्वी! VIDEO

    दिनांक :11-Oct-2025
Total Views |
नवी दिल्ली,
Yashasvi Jaiswal Run Out वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात यशस्वी जयस्वालने पहिल्या दिवशी उत्कृष्ट खेळी करत दमदार शतक झळकावले. तो दिवसाच्या शेवटी १७३ धावांवर नाबाद होता आणि त्याच्या सातत्यपूर्ण फॉर्ममुळे सर्वांना त्याच्या द्विशतकाची खात्री होती. मात्र, दुसऱ्या दिवशी झालेल्या धावबादामुळे त्याचे द्विशतक पूर्ण होऊ शकले नाही. नवव्या षटकात जेडेन सील्सच्या एका चेंडूवर जयस्वालने धाव घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी शुभमन गिल नॉन-स्ट्राइक एंडवर असताना त्याने जयस्वालला थांबण्याचा इशारा दिला. जयस्वाल घाईघाईने परत आला, पण खूप उशीर झाला आणि फील्डरने चेंडू विकेटकीपरकडे पोहचला होता. जर गिलने थांबवण्याऐवजी धाव घेतली असती, तर जयस्वाल सहजपणे धाव पूर्ण करू शकला असता. या चुकीमुळे जयस्वाल खूप रागावलेला आणि निराश दिसला.
 
Yashasvi Jaiswal Run Out
 
 
सध्या भारताने दुसऱ्या कसोटी सामन्यात ३ गडी गमावले असून ३७१ धावा केल्या आहेत. यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी ५८ धावांची भागीदारी करून संघासाठी मजबूत पाया रचला. त्यानंतर तिसऱ्या दिवशी साई सुदर्शनने ८७ धावा केल्या. कर्णधार शुभमन गिलनेही अर्धशतक झळकावले असून सध्या ५० धावांसह क्रीजवर आहे जयस्वालच्या अप्रतिम खेळीमुळे भारतीय संघाची स्थिती स्थिर राहिली आहे, पण द्विशतक न होणे यामुळे त्याच्या खेळाडूच्या भावनांवर काहीसा परिणाम झाला आहे.