नामदेव केशवे यांच्या आत्मचरित्राचे खा. अशोक चव्हाण यांच्या हस्ते प्रकाशन

(नामदेव केशवे यांचा सत्कार करताना मान्यवर)

    दिनांक :11-Oct-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
श्रीक्षेत्र माहूर,
ashok-chavan : बालाजी मंगलमच्या सभागृहात शनिवार, 11 ऑक्टोबार सकाळी 11 वाजता कापूस पणन महासंघाचे माजी उपाध्यक्ष तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नामदेव केशवे यांचा जीवनगौरव सोहळा आणि त्यांच्या ‘माझ्या आठवणीतील माणसं’ या आत्मचरित्राचे प्रकाशन माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते झाले.
 
 
 
y11Oct-Keshave
 
व्यासपीठावर आमदार भीमराव केराम, माजी खा. भास्कर पाटील, आ. विक्रम काळे, आ. किसन वानखेडे, माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा, अमरनाथ राजूरकर, किशोर देशमुख, प्रवीण चिखलीकर, श्यामबापू महाराज यांची उपस्थिती होती. दीपप्रज्वलनानंतर केशवे परिवाराने मान्यवरांचा सत्कार केला.
 
 
यावेळी बोलताना खा. अशोक चव्हाण म्हणाले, समन्वय राखून नि:पक्षपणे काम करणे, गुंतागुंतीचे प्रश्न हाताळणे, अडचणीच्या काळात नाऊमेद न होणे, अशा अनेक आदर्श गुणांचा ठेवा त्यांच्या ठायी मोठ्या प्रमाणात असल्याने आपणा सर्वांसाठी ते निश्चितच प्रेरणादायी आहेत. खा. चव्हाण यांनी यावेळी, नामदेवरावांना आमदार करता आले नाही, याची खंत व्यक्त केली.
 
 
प्रल्हाद गावंडे, शिवराज राघू, आमदार भीमराव केराम, आमदार किसन वानखेडे, आमदार विक्रम काळे, माजी आयुक्त पुरुषोत्तम गावंडे, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, माजी मंत्री भास्कर पाटील यांनी मनोगतातून नामदेवरावांच्या राजकीय प्रवासातील अनेक गोष्टींना उजाळा देऊन गौरवोद्गार काढले.
 
 
सत्कारमूर्ती नामदेव केशवे यांनी सत्काराला उत्तर देताना सर्व मान्यवरांनी वेळोवेळी केलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून आभार मानले. प्रास्ताविक प्रा. राजेंद्र केशवे यांनी केले, तर बाबाराव केशवे यांनी आभार मानले. यावेळी नामदेव केशवे यांच्या चाहत्यांची मोठी उपस्थिती होती.