तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
Indranil Naik राष्ट्रीय नंदगवळी समाजातर्फे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. नंदगवळी समाजाचा मुख्य व्यवसाय दुधाचा असून दèयाखोèयात राहून उपजीविका करीत आल्याने या समाजाकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे, असे सांगण्यात आले
आपल्या निवेदनात समाजाला अनुसूचित जातीमध्ये वर्ग करावे, अनुसूचित जातीमध्ये वर्ग होईपर्यंत विमुक्त भटक्या जातींचे 2.5 टक्के आरक्षण 10 टक्के करण्यात यावे, समाजास बी वर्गातून ए मध्ये घेण्यात यावे, शिक्षणात पूर्णतः सवलत देऊन स्कॉलरशिप मंजूर करण्यात यावी, श्रीकृष्ण महामंडळ त्वरित सुरू करावे, या प्रमुख मागण्या केल्या आहेत.
राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी यावेळी सांगितले की, आपल्या मागण्या रास्त असून त्या तातडीने पूर्ण करू. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून पूर्ण मागण्या मार्गी लावू. निवेदन देताना राष्ट्रीय नंदगवळी समाज संघटनेचे ओंकार चेके, पंडित बोपटे, सुधाकर डोळे, मनोहर चौकोने, बाळासाहेब डोळे, रमेश झामरे, पवन झामरे, गजानन चेके, विजय चावरे, सुभाष काकडे, रविकांत पाने, अक्षय साठे, अंकुश काकडे, सुभाष कालोकार यांच्यासह अनेक समाजबांधव उपस्थित होते.