सिंदीरेल्वे,
Amol Pusadkar इंग्रजांच्या गुलामगिरीचे पाश तोडण्यासाठी सर्व सामान्य जनतेला राष्ट्रप्रेमाची जाणीव झाली पाहिजे या पवित्र हेतूने डॉ. केशव बळिराम हेडगेवार यांनी सन १९२५ मध्ये १७ सवंगड्यांच्या मदतीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली होती. आज संघ जागतिक स्तरावर पोहचला. त्याचे श्रेय लाखो पूर्णवेळ सेवारत स्वयंसेवकांना आहे, असे विचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारतीय विचार मंचाचे प्रांत टोळी तथा समरसता गतिविधी, प्रांत टोळी सदस्य अमोल पुसदकर यांनी व्यत केले.
जुन्या पोलिस स्टेशनच्या पटांगणात शनिवार ११ रोजी आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सिंदी रेल्वे शाखेच्या विजया दशमी उत्सवात बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी अध्यापक ज्ञानेश्वर बेलखोडे होते. बेलखोडे यांनी रा. स्व. संघाच्या शताद्धीत झालेल्या विविध समाजोपयोगी आणि राष्ट्रीय कार्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली. संघाची शिस्त, एकाग्रता आणि समर्पणाची भावना देशाला दिशादर्शक ठरेल, अशी असा विश्वास व्यत केला.सायंकाळी ५ वाजता स्थानिक स्वयंसेवकांचे पथसंचलन निघाले. नगर परिक्रमा करीत मुख्य कार्यक्रमस्थळी पोहोचले. कवायती, सुविचार व समर गीते सादर करण्यात आली. जाग रहा है,जन गण मन,निश्चित होंगा परिवर्तन या गीताने उपस्थितांना ऊर्जा दिली.
पाहुण्याचा व प्रमुख वतांचा परिचय खंड कार्यवाह अंकित ढोबळे यांनी दिला. कार्यक्रमाला यंदा मोठ्या प्रमाणात संघप्रेमी जनतेसोबतच महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.