नागपूर,
Amrit Mahotsav हिलटॉप, रामनगरचे रहिवासी आणि अनुभवी डॉक्टर डॉ. राजीव कुलकर्णी व त्यांच्या पत्नी यांनी अनेक वर्षांपासून सेवाभावाने रा.स्व.संघ लोककल्याण समिती आणि पश्चिम नागपूर नागरिक संघ, रामनगर यांच्या सहकार्याने पांढराबोडीतील ट्रस्ट लेआउट येथील संत रविदास रुग्णालयात रुग्णसेवा प्रदान केली आहे.
त्यांच्या अमृत महोत्सव निमित्त वस्तीतील नागरिक, युवा वर्ग आणि रा.स्व.संघाचे कार्यकर्त्यांनी उत्साहाने हा सोहळा साजरा केला. कार्यक्रमात विशेष उपस्थिती गुलाब वंजारी, डॉ. आनंद नाशिककर, पश्चिम नागपूर नागरिक संघाचे अध्यक्ष रवी वाघमारे, विठ्ठल चोपडे, चंदुजी हलकंदर, विलास जुगादे, शिरीषजी वैद्य, गणेश कुल्हर, धर्मेंद्र तूरकर, विवेक व स्वाती हुद्दार, धनश्री बैंगने, महेश मनानी, यश, रामस्वरूप यांची होती. Amrit Mahotsav यासह इतर गणमान्य नागरिक उपस्थित होते. सर्वप्रथम ७५ दिव्यांनी औक्षण केले गेले आणि “सुदिनम, सुदिनम जन्मदिनम” हे श्लोक म्हणत डॉक्टर दांपत्याचे अभिष्ट चिंतन करण्यात आले. कार्यक्रमात उपस्थितांनी डॉक्टर दांपत्याच्या सेवा वृत्तीचे कौतुक केले आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
सौजन्य: रवी वाघमारे, संपर्क मित्र