वर्धा,
Bor tiger project बोर व्याघ्र प्रकल्पाची राणी बीटीआर-३ कॅटरिना नामक रुबाबदार वाघिणीचे तिच्या दोन बछड्यांसोबत रविवार १२ रोजी सकाळी पर्यटकांना दर्शन झाले. व्याघ्र दर्शन झाल्याने पर्यटकांनाचा आनंद द्विगुणीत झाला.
क्षेत्रफळाने छोटा पण व्याघ्र घनता जादा असा हा बोर व्याघ्र प्रकल्प पट्टेदार वाघांसह विविध वन्यजीवांच्या संवर्धनासाठी उपयुतच ठरणारा आहे. या व्याघ्र प्रकल्पाला विविध सिनेअभिनेते, सेलिब्रिटी तसेच व्हीव्हीआयपींनी भेटी देत जंगल सफारीचा आनंद लुटला आहे. मान्सून कालावधीनंतर यंदा १ ऑटोबरला जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांच्या हस्ते बोर व्याघ्र प्रकल्पाचे दारं जंगल सफारीसाठी खुले करण्यात आली आहे. १ ते ११ ऑटोबर या कालावधीत बोरच्या जंगल सफारी दरम्यान ६ ते ७ रानकुत्र्यांचा कळप, २ अस्वली, २ बिबटचे दर्शन पर्यटकांना झाले. तर १२ ऑटोबरला सकाळी जंगल सफारीदरम्यान मुंबई मंत्रालयातील महसूल व वन विभागाचे कक्ष अधिकारी निलेश निंबाळकर, दिनेश उईके, निलेश ब्राह्मणे, सागर तायडे, आशिष भगत, गुणवंत मोहर्ले, मनोज लाखे व गाईड कैलास भोरे यांना जुने बोर वन परिक्षेत्रात बोरची बीटीआर-३ कॅटरिना नामक वाघिणीचे तिच्या दोन पिलांसोबत दर्शन झाले. देखण्या आणि रुबाबदार बोरच्या राणीचे जंगल सफारी दरम्यान दर्शन झाल्याने पर्यटकांचा आनंद द्विगुणीत झाला होता.
दिवाळीच्या सुट्यांत वाढणार गर्दी
दिवाळी सण तोंडावर आला आहे. दिवाळीच्या सुट्यांचा आनंद घेताना अनेकांकडून जंगल सफारीचेही नियोजन केले जाते. शिवाय सेलू तालुयातील बोर व्याघ्र प्रकल्पाला जंगल सफारीसाठी अनेकांकडून प्राधान्यही दिले जाते. दिवाळीच्या सुट्यांमध्ये बोर व्याघ्र प्रकल्पाच्या जंगल सफारीसाठी पर्यटकांची गर्दीच होण्याची शयता आहे.