इमारतींच्या अपयशाचा शोध घेणारे स्थापत्य अभियंते सन्मानित

‘न्यायवैद्यक स्थापत्य अभियांत्रिकी भविष्यातील अपघात टाळण्यासाठी महत्त्वाची’

    दिनांक :12-Oct-2025
Total Views |
नागपूर,
civil engineering seminar इमारती किंवा उड्डाणपुलांच्या कोसळण्यामागील कारणांचा सखोल अभ्यास केल्यास भविष्यातील अपघात टाळता येऊ शकतात, असे प्रतिपादन स्थापत्य अभियंता इंजि. सतीश रायपुरे यांनी केले. ‘न्यायवैद्यक स्थापत्य अभियांत्रिकी’ Forensic Structural Engineering हे या संदर्भात एक प्रभावी साधन असून, त्याच्या मदतीने इमारतींच्या अपयशामागील मूळ कारणांचा शोध घेता येतो, असे ते म्हणाले.
 

civil engineering seminar  
उत्तर अंबाझरी मार्गावरील इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्सच्या सभागृहात आयोजित ‘सिव्हिल इंजिनिअरिंग’ या विषयावरील दोन दिवसीय चर्चासत्राच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. संदीप शिरखेडकर, निवृत्त न्यायमूर्ती अविनाश घरोटे, डॉ. शिंगारे, डॉ. दिलीप मसे, महेश शुक्ला, स्वप्नील साटोणे आदी उपस्थित होते.इमारती कोसळल्यानंतर त्या मागे काही संकेत, काही चिन्हे ठेवून जातात. या चिन्हांवरून बांधकामातील त्रुटी किंवा अपयश स्पष्ट करता येते. न्यायवैद्यक स्थापत्य अभियांत्रिकीच्या साहाय्याने अभियंते हे संकेत नीट समजून घेऊन विश्लेषण करतात आणि भविष्यातील अपघातांना आळा घालू शकतात. त्यामुळे सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने ही शाखा अत्यंत महत्त्वाची ठरत असल्याचे रायपुरे यांनी नमूद केले.
चर्चासत्रात ‘स्ट्रक्चरल अपयशांचे निदान आणि निराकरण’ या विषयावर सखोल चर्चा झाली. भविष्यातील नागरी व पायाभूत विकासाच्या दृष्टीने बांधकाम क्षेत्रात येणाऱ्या आव्हानांवर मात करण्यासाठी अभियंत्यांनी सज्ज राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्सच्या नागपूर लोकल सेंटरमध्ये सध्या ३,००० हून अधिक व्यावसायिक सदस्य आहेत. या व्यासपीठावरून अभियंत्यांना आधुनिक तंत्रज्ञान, बांधकाम क्षेत्रातील नव्या घडामोडी आणि समस्या यावर चर्चा करण्याची संधी मिळते.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी चर्चासत्रात सहभागी अभियंत्यांचा तसेच कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात सहभाग असलेल्या प्रायोजकांचा सन्मान करण्यात आला.या चर्चासत्रामुळे स्थापत्य अभियांत्रिकीच्या विविध पैलूंवर नव्या दृष्टिकोनातून विचार होण्यास चालना मिळाली असून, नागपूर शहराच्या भविष्यकालीन नागरी विकासासाठी अशा चर्चासत्रांची गरज असल्याचे उपस्थित मान्यवरांनी स्पष्ट केले.