सागवान लाकडांची अवैध वाहतूक उघड

    दिनांक :12-Oct-2025
Total Views |
कारंजा लाड,
illegal teak wood transportation, कारंजा वनपरिक्षेत्र विभागाच्या पथकाने केलेल्या धाडसी कारवाईत सागवान इमारती लाकडांची अवैध वाहतूक उघड झाली. ११ ऑक्टोबर रोजी वर्धा—नागपूर मार्ग परिसरात राबविण्यात आलेल्या शोध मोहिमेदरम्यान पथकाने एकूण २४ नग सागवान लाकडे जप्त केली.
 

illegal teak wood transportation 
प्राथमिक तपासणीत ही लाकडे अवैधरित्या वाहतूक करून आणल्याचे समोर आले असून, जप्त लाकडांची एकूण १.४२ घन मीटर एवढी मात्रा आहे. लाकडांवर कोणतेही हॅमर मार्क नसल्याचे आढळून आल्याने ती सरकारी परवानगीशिवाय तोडण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी गिरीष जतकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल खंडारे व वनरक्षक प्रवीण भगत यांच्या संयुक्त पथकाने केली. गुप्त माहितीच्या आधारे राबविण्यात आलेल्या या शोध मोहिमेत पथकाने दक्षतेने तपासणी करून अवैध सागवान लाकडे हस्तगत केली. सदर प्रकरणी वन गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या कारवाईस उपवनसंरक्षक अभिजित वायकोस व सहाय्यक वनसंरक्षक शरयू रुद्रावार यांनी मार्गदर्शन केले.