तभा वृत्तसेवा यवतमाळ,
Blood Donation Camp जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना पथक व सर्व विभागाच्या क्लबव्दारे बुधवार, 8 ऑक्टोबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. वंसतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जगदंबा अभियांत्रिकीच्या राष्ट्रीय सेवा योजना पथक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या प्रसंगी संस्थेचे सचिव डॉ. शितल वातीले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय भांबेरे, रक्त संकलन अधिकारी डॉ. दिव्या शर्मा, समाजसेवा अधिक्षक आशिष दहापुते, विभागप्रमुख प्रा. सचिन मुराब, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रवीण वानखडे, रासेयो सहकार्यक्रम अधिकारी डॉ. सुमीत राऊत, प्रा. विकास बनकर, प्रा. माहिउद्दीन खान, प्रा. प्रणय देवगडे, प्रा. कुणाल पाटील उपस्थित होते.
डॉ. दिव्या शर्मा यांनी रक्तदानाचे महत्व या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करुन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना रक्तदान करण्याकरीता प्रेरीत केले तसेच यवतमाळ हा अतिउष्ण जिल्हा म्हणून प्रसिद्ध असल्यामुळे दरवर्षी उन्हाळयात सरकारी रक्त पेढी मध्ये रक्तपिशव्यांची कमतरता जानवते म्हणुन जास्तित जास्त विद्यार्थ्यांनी रक्तदान करावे असे आव्हान केले.
डॉ. शितले वातीले यांनी रक्तदान करणाèया विद्यार्थ्यांचे कौतुक करतांना सांगितले की, आज विज्ञानाच्या मदतीने विविध प्रकारच्या औषधी, वैक्सीन प्रयोगशाळेत बनविल्या जातात परंतु जिवंत राहण्यासाठी सर्वात जास्त आवश्यक असलेल्या रक्ताची आतापर्यंत निर्मिती होवु शकली नाही. रक्ताला दुसरा पर्याय नाही. रक्ताची कमतरता फक्त रक्तदाना द्वारेच पुर्ण केल्या जाऊ शकते म्हणुन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी रक्तदान केले पाहीजे असे प्रतिपादन केले.
प्राचार्य डॉ. विजय भांबेरे यांनी रक्तदानाचे महत्व पटवून देतांना म्हणाले, सवीत शेष्ठदान हे रक्तदान आहे. यामुळे तुम्ही एखादया व्यक्तीचे प्राण वाचवू शकता व पुण्य प्राप्त करू शकता.
या रक्तदान शिबिरात सुमारे 98 विद्यार्थी व प्राध्यापक वृंदांनी रक्तदान करुन समाजसेवेप्रती आपली बांधिलकी दाखवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन रासेयो स्वयंसेविका साक्षी महल्लेने केले. कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थी प्रतिनीधी प्रणव धाये व मेसा क्लब प्रतिनीधी जय खंडार व सर्व रासेयो स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले