मानोरा,
Manora tehsil teacher petition तालुक्यातील सर्व घड्याळी तासिका तत्त्वावरील शिक्षकांचे दोन वर्षा पासूनचे मानधन रखडलेले असून कंत्राटी शिक्षकावर उपासमारीची पाळी आली आहे.येत्या दिवाळी पूर्वी प्रलंबित मानधन मिळावे यासाठी निवेदन तहसीलदार मार्फत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थ मंत्री अजित पवार यांना पाठविले आहे.
एकीकडे सर्व शासकीय कर्मचार्यांच्या पगार शासन वेळेवर देतात आणि घड्याळी तासिका तत्वावरील शिक्षकांना दोन वर्षापासून एक दमडीही दिली नाही. कर्मचार्याची दिवाळी अंधारात जाते की काय असा प्रश्न कंत्राटी शिक्षकांना भेडसावत आहे. ज्या शाळेवर कंत्राटी शिक्षक तोकड्या मानधनावर विद्यादानाचे पवित्र कार्य करीत आहे त्यांनाच दोन वर्षापासून चे मानधन देण्यात आले नाही तरी आपण याकडे गांभीर्याने विचार करून येणार्या दिवाळी पूर्वी मानधनाचा प्रश्न निकाली काढून कंत्राटी शिक्षकांचे सुद्धा दिवाळी गोड करावी अशी आर्त हाक मनोरा तालुक्यातील सिएचबी शिक्षकांनी निवेदनातून दिली आहे. निवेदनावर प्रा.अनिल चव्हाण, प्रा. हर्षल निंबाळकर, कृष्णा गावंडे, प्रा. शिवम ठाकरे, प्रा.आशिष भगत, प्रा. स्वरूपा राठोड, प्रा.भीमराव राठोड, प्रा.वैभव ठाकरे, व इतर सर्व कंत्राटी शिक्षकांच्या सह्या आहेत.