मनपातर्फे योगगुरू नामदेव फटिंग यांचा सन्मान

    दिनांक :12-Oct-2025
Total Views |
नागपूर,
Municipal Corporation समाजकल्याण विभाग, नागपूर महानगरपालिका यांच्या वतीने आयोजित जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते व योगगुरू नामदेव फटिंग यांचा सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम कविवर्य सुरेश भट सभागृहात पार पडला. या प्रसंगी मनपा अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी. यांच्या हस्ते फटिंग यांना सन्मानचिन्ह, वस्त्र आणि तुळशीचे रोप देऊन गौरविण्यात आले.
 
Municipal Corporation
 
कार्यक्रमाला मनपा उपायुक्त डॉ. रंजना लाडे, स्वास्थ्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, सहाय्यक आयुक्त नरेंद्र बावनकर, सुरेश रेवतकर, हुकुमचंद मिश्री कोटकर, मनोहर खर्चे, डॉ. राजू मिश्रा, प्रभू देशपांडे, अ‍ॅड. अविनाश तेलंग आणि इतर मान्यवर उपस्थित होते. Municipal Corporation कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांच्या सामाजिक योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
सौजन्य: श्रीराम दुरुगकर, संपर्क मित्र