हनुमान मंदिरात महिला स्वसंरक्षण वर्गाचे उद्घाटन

    दिनांक :12-Oct-2025
Total Views |
नागपूर,
Udham Singh Yadav महिला प्रबोधन मंडळ आणि हनुमान मंदिर देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने स्वसंरक्षण वर्गाचे उद्घाटन हनुमान मंदिर येथे संपन्न झाले. कार्यक्रमाचे उद्घाटन भारतातील पहिल्या साहसी संस्थेचे संस्थापक उधमसिंग यादव यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी शिवाजीनगर संघप्रमुख गुलाब वंजारी, हनुमान मंदिर देवस्थानाचे सचिव प्रशांत जोशी, महिला प्रबोधन मंडळाच्या अध्यक्षा विजया पाध्ये व सचिव उर्मिला राजदरेकर उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजया पाध्ये यांनी केले. सूत्रसंचालन तृप्ती आकांत यांनी, प्रमुख अतिथींचा परिचय अंजली चोरघडेनी केला. मुख्य अतिथींचे स्वागत स्वसंरक्षण वर्गाचे प्रशिक्षक प्रतीक जोशी यांनी केले. कार्यक्रमात अखिल भारतीय मराठा महासंघाचा “मराठा भूषण पुरस्कार” प्राप्त अविनाश घांगरेकर यांचा सत्कारही करण्यात आला.

udham 
 
 
उधमसिंग यादव यांनी आपल्या अनुभवातून विद्यार्थ्यांना शौर्याच्या कथा सांगून स्वसंरक्षणाचे महत्त्व पटवून दिले. तसेच, दर रविवारी स्वसंरक्षण शिबिर आयोजित करण्याची घोषणा त्यांनी केली.Udham Singh Yadav कार्यक्रमासाठी प्रशिक्षक प्रतीक जोशी, अर्णव देव, जान्हवी घांगरेकर, आर्या चोरघडे, विद्यार्थी व उपस्थित श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.हनुमान मंदिराचे सदस्य अभय चोरघडे, श्रीकांत पांडे, भूषण टेंभेकर आणि महिला प्रबोधन मंडळाच्या कार्यकारिणी सदस्यांचे सहकार्य कार्यक्रम यशस्वी करण्यात महत्त्वाचे ठरले.आभार प्रदर्शन मेघा ढोमणे यांनी केले.
 
सौजन्य : अभय चोरघडे, संपर्क मित्र