नवी दिल्ली,
nda-bihar-bjp-jdu आगामी बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एनडीएचा सीट शेअरींग फॉर्म्युला आता निश्चित झाला आहे. प्रदीर्घ बैठका आणि चर्चांनंतर, भारतीय जनता पार्टी आणि जनता दल युनायटेड प्रत्येकी 101 जागांवर निवडणूक लढवतील. एकूण 243 जागांच्या बिहार विधानसभेत लोजपा 29, आरएमएमला 6 आणि एचएएमला 6 जागा मिळाल्या आहेत. नवी दिल्लीत झालेल्या मॅराथॉन बैठकांनंतर, सर्व सहयोगी पक्षांना समाधानकारक असे जागावाटप करण्यात एनडीएला यश आले आहे.
nda-bihar-bjp-jdu या जागावाटपानंतर, बिहारमध्ये ‘मोठा भाऊ, छोटा भाऊ’ समीकरण संपुष्टात आल्याचे चित्र आहे. या बैठका सौहार्दपूर्ण वातावरणात झाल्याचे लोजपाचे नेते खासदार चिराग पासवान यांनी ट्विट करून सांगितले. आपल्या ट्विटमध्ये चिराग यांनी पाचही पक्षांच्या जागावाटपाची सविस्तर माहिती दिली आहे. त्यांच्या ट्विटनंतर ‘बिहार फर्स्ट, बिहारी फर्स्ट’ हा हॅशटॅग ट्रेंड करीत आहे. सर्व बिहारीजन एनडीए सरकारच्या सोबत असल्याचेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.